वेगळा उपक्रम; अन् महिला दिनी मुलांनी केली आपल्या आईंची पूजा
By Appasaheb.patil | Published: March 8, 2023 06:33 PM2023-03-08T18:33:54+5:302023-03-08T18:35:00+5:30
महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले.
सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींच्या शाळेत एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला. या उपक्रमाने तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात शाळेच्या शिक्षकांचे कौतुक केले जात आहे. महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील प्रत्येक मुलांच्या आईला शाळेत बोलावून मुलांनी आरती करून आईचे आर्शीर्वाद घेतले. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने पालक ही भारावून गेले.
दरम्यान, कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुगळीचे मठाधीश महानंदाताई मठपती होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व अध्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व माता पालकांची पाद्यपूजा पाल्याकडून करण्यात आली. यावेळी सर्व माता भाविक होऊन डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यानंतर माता पालकाकडून वेगवेगळे खेळ आयोजित करून कळविण्यात आले. या कार्यक्रमामुळे सर्व माता-पालक भारावून गेल्या होत्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पाटील व चिदानंद नागोर यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी केले होते. आभार गुरुलिंगप्पा शिवणगी यांनी मानले.