विशेष सेवा; पोस्टमन काका देतात आता बँक खातेदारांना पैसे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 02:10 PM2020-07-18T14:10:06+5:302020-07-18T14:12:16+5:30
औषधे आली सर्वाधिक : ५२ कार्यालयांचे ४५० डाकसेवक बनले कोविड योद्धे
सोलापूर : टपाल कार्यालयातील बचत खात्याचे पैसे तर सोडाच आता पोस्टमन बँकांचेही पैसे वाटप करू लागले असून, कोरोना काळातील ही विशेष सेवा आहे. सोलापूर विभागात आजही दररोज ३ लाख रुपये वाटप होत आहे. पैशांबरोबरच औषध पोहोचविण्याची सेवा पोस्टमन दादांकडून अव्याहतपणे सुरू आहे.
इंटरनेट युगात पोस्टाचे महत्त्व कमी होईल, असे बोलले जात होते़ मात्र अलीकडे पोस्टाचीच सेवा महत्त्वपूर्ण ठरली. कोरोना काळात केंद्राने पोस्ट सेवेला अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे़ त्यामुळे कोरोनाने कोणी पोस्ट कर्मचारी दगावल्यास सरकारने त्यांच्यासाठी दहा लाखांची मदत जाहीर केली आहे़ तसेच हँडग्लोज, मास्क, फेस सिल्ड, सॅनिटायझरही पुरवले आहे़ या काळात डाकसेवकांनी रजिस्टर बटवड्याबरोबरच पार्सल, स्पीड पोस्ट, मनी आॅर्डर, औषधे आणि बँक खातेदारांना पैसेही घरपोच वाटप सुरू केली आहे़ फोन केला की पोस्टमन पैसे घेऊन घरी येऊन देतो, ही सेवा सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.
गुरुनानक चौक कार्यालयाने आधार लिंकिंग असणाºया खातेदारांना बँकेत जाऊ न देता बाहेरच दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम त्यांच्या खात्यातून वाटप केली.
बºयाच ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन अंगठा घेऊन, आधार पाहून पेन्शन वाटप केली़ गुरुनानक पोस्ट कार्यालयातून एप्रिल महिन्यात २४ बँक खातेदार (७७ हजार ३०० रुपये), मे महिन्यात १३५ बँक खातेदार
(३ लाख ८४ हजार १०० रुपये),
जून महिन्यात १३७ बँक खातेदार (२ लाख ८१ हजार ६०० रुपये) आणि जुलै महिन्यात २१ खातेदारांना (१ लाख २८ हजार रुपये) पैसे वाटप केले आहेत.
असे मिळतात पैसे...!
ज्याचे बँकेत खाते आहे त्याचे खाते पोस्टात असावेच असे नाही़ पोस्टात खाते नसणारी व्यक्ती डाक कार्यालयाशी संपर्क साधून आपले नाव, बँक खाते सांगून जमा रकमेची चौकशी करता येते़ या खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम मागू शकतो़ तेवढी रक्कम घेऊन संबंधित पोस्टमन घरी येतो़ बँक खातेदाराचे आधार नंबर पाहून तो मशीनवर अंगठ्याचा ठसा घेतो आणि मागितलेली रक्कम देऊन निघून जातो़ पोास्टाच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळातोय़
कोरोना काळात पोस्ट सेवेची जबाबदारी वाढली आहे़ आधार लिंक असणाºया बँक खातेदारांना, पेन्शनधारकांना घरी जाऊन त्यांच्या खात्यातून दहा हजारांपर्यंतची रक्कम वाटप केली जात आहे़ यामुळे बँकेसमोरील खातेदारांची गर्दी कमी झाली आहे़ आता सर्वसामान्यांचा पोस्टाकडे कल वाढल्याने दररोज तीन लाख रुपये वाटतोय़ याशिवाय दररोज औषधांचे शंभर पार्सल वाटतोय़
- एस. पी. पाठक
प्रभारी पोस्ट अधीक्षक