वटपौर्णिमा विशेष; दीडशे वर्षांपासून आजही वटवृक्ष देतोय सुहासिनींच्या पती प्रार्थनेला साद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 01:28 PM2021-06-24T13:28:11+5:302021-06-24T13:29:14+5:30

निमित्त वटपौर्णिमेचे : छत्रपती संभाजी तलावानजीकचे वृक्ष चार पिढ्यांचे साक्षीदार

Special in Vatpoorni; Suhasini's husband has been giving banyan tree for one and a half hundred years. | वटपौर्णिमा विशेष; दीडशे वर्षांपासून आजही वटवृक्ष देतोय सुहासिनींच्या पती प्रार्थनेला साद !

वटपौर्णिमा विशेष; दीडशे वर्षांपासून आजही वटवृक्ष देतोय सुहासिनींच्या पती प्रार्थनेला साद !

googlenewsNext

सोलापूर - जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, अशी प्रार्थना करीत वडाच्या झाडाचे पूजन करण्याची पूर्वापार परंपरा आहे. चार पिढ्यांचे साक्षीदार असलेल्या दीडशे वर्षांपासूनचे वटवृक्ष आजही सुहासिनींच्या पती प्रार्थनेला साद देत आहेत.

पूर्व भागातील पाहिले वटवृक्ष भारतीय चौकात असून येथील एकत्र असलेले वड, पिंपळ आणि लिंब पूर्व भागातील महिलांचे श्रद्धास्थान असून ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे प्रतीक मानून त्याचे पूजन करतात. याच ठिकाणी नागोबाचे मंदिर असून, शंभर वर्षे जुना वटवृक्ष आहे. हैदराबाद रोड विडी घरकुल आणि गोदूताई विडी घरकुल येथेही शंभर वर्षांपूर्वीचे वृक्ष आहेत. गावठाण भागात सिद्धेश्वर तलाव परिसरात गणपती घाट, जुने विठ्ठल मंदिर, भुईकोट किल्ला परिसरातील वृक्षही गेल्या शंभर वर्षांपासून आहेत.

तलाव परिसरात यलगुलवार प्रशालेनजीक असलेले वडाचे झाड दोनशे वर्षांपूर्वीचे असून त्याचा बुंधा जवळपास चाळीस फूट आहे. वॉटर फ्रंट विकसित झाल्यावर सुद्धा ते तसेच ठेवण्यात आले आहे. नगर, रत्नदीप, कृषी, नगर एम्प्लॉयमेंट सोसायटी, ज्ञानदीप, मंजुषा, आकांक्षा, कोर्ट कॉलनी, पोस्टल कॉलनी, उज्ज्वला सोसायटीतील महिला पूजनासाठी येतात.

विजापूर रोडवर वन भवनसमोर वसंतराव नाईक नगरच्या प्रवेशद्वारावर मागील पस्तीस वर्षांपासून एक वडाचे झाड असून, मागील तीन-चार पिढ्यांपासून सुहासिनी वटसावित्री पौर्णिमेस इथे पूजनाला येतात. शेळगी गावठाणची ओळख असलेले बनशंकरी नगर येथील पन्नास-साठ वर्षांचे जुने वडाचे झाड पडल्याने येथील महिलांना पूजनाची पंचाईत झाली. तीन वर्षांपूर्वी अलका मलगोंडे यांनी लावलेल्या वडाच्या झाडाचे पूजन शेळगी परिसरातील दहा ते पंधरा नगरांतील महिला करीत असतात.

गवईपेठ तात्या मारुती मंदिरातील पन्नास-साठ वर्षांचे झाड पडल्यानंतर आठ वर्षांपूर्वी नारायण सामलेटी यांनी रोपण केलेल्या वृक्षाचे कविता नगर, विठ्ठल पेठ, जुना बोरामणी नाका येथील महिला पूजन करत आहेत, तर २५६ गाळे जवळील दत्त मंदिर परिसरात असलेले वृक्ष आहेत. याव्यतिरिक्त विजयपूर रोडवरील सैफुल नगर, आर टी ओजवळील रामलिंग नगर, अशोक नगर, आदित्य नगर, देगाव रोडवर गंगा नगर, बाळे परिसरातील जवळपास तीस ते चाळीस वटवृक्ष, सुहासिनींच्या, जन्मोजन्मी हाच पती मिळू दे, या प्राथनेला साद देत उभी आहेत.

- शंभर वर्षे जुने झाड दहा वर्षांपूर्वी पडले..

रेवणसिद्धेश्वर परिसरातील १०० वर्षांपूर्वीचे झाड १० वर्षांपूर्वी पडले. गणेश तरुण मंडळाने त्याच ठिकाणी नवे झाड रोपण केले. याच वटवृक्षांचे पूजन करण्यासाठी मोरे सोसायटी, जवान नगर, मानस अपार्टमेंट, विजापूर नाका, दोन नंबर झोपडपट्टीतील महिला येतात. मंदिर असल्याने भक्तांचे प्रमाण जास्त आहे.

Web Title: Special in Vatpoorni; Suhasini's husband has been giving banyan tree for one and a half hundred years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.