तारखा जाहीर होताच गावगाड्यात हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:18+5:302021-02-06T04:39:18+5:30

९ रोजी आळगे, बादोले बु, बऱ्हाणपूर, भुरीकवठे, चप्पळगाव/बवकरवाडी, बोरोटी बु, चुंगी, डोंबरजवळगे, गोगाव, गुद्देवाडी, हैद्रा, उमरगे, हन्नूर, हिळळी, जेऊर, ...

Speed up the movement in the village as soon as the dates are announced | तारखा जाहीर होताच गावगाड्यात हालचालींना वेग

तारखा जाहीर होताच गावगाड्यात हालचालींना वेग

Next

९ रोजी आळगे, बादोले बु, बऱ्हाणपूर, भुरीकवठे, चप्पळगाव/बवकरवाडी, बोरोटी बु, चुंगी, डोंबरजवळगे, गोगाव, गुद्देवाडी, हैद्रा, उमरगे, हन्नूर, हिळळी, जेऊर, कलहिप्परगे, खैराट, किणीवाडी, कुमठे, मराठवाडी, मिरजगी, मूगळी, मुंढेवाडी, नागोरे, पितापूर, सांगवी बु, संगोगी(आ.), शिरसी, सिंनुर, तोळणूर, उडगी, तडवळ असे ३२ गावचे सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे. त्यासाठी गावाच्या संख्येनुसार प्रत्येकी एक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

११ रोजी आंदेवाडी बु, बॅगेहल्ली, बसलेगाव, बबलाद, चप्पळगाववाडी, चिंचोळी(मैं.), देवीकवठे, गळोरगी, गौडगाव खु, गुरववाडी, हालहळळी (अ), हंद्राळ, इब्राहिमपूर, काझीकणबस, कर्जाळ, किणी, कोर्सेगाव, कुरनूर, मातनहळळी, मोटयाळ, नागनहळळी, नागणसूर, निमगाव, साफळे, सांगवी खु, शेगांव, शिंदखेड, सुलेरजवळगे, तोरणी, वागदरी, किरनळळी अशा ३१ गावांतील निवड होणार आहे.

१३ रोजी आंदेवाडी खु, बणजगोळ, भोसगे, बोरीटी खु, चिक्केहळळी, चिंचोळी (न), दोड्याळ, गौडगाव बु,असे ८ गावांचे सरपंच निवड होणार आहे. अशा प्रकारे तीन टप्प्यात तब्बल ७२ गावांचे सरपंच, उपसरपंचाची निवड होणार आहे. याबाबत प्रशासनाची तयारी तहसीलदार अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली आहे. या निवडणुकीसाठी ३२ निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

पॅनलप्रमुखांची सावध भूमिका

ज्या-ज्या गावांमध्ये एका सदस्यसंख्येच्या फरकाने बहुमत आहे. अशा गावांतील पॅलनप्रमुखांनी वेळीच सावध होत आपल्या सदस्यांना सहलीवर घेऊन गेले आहेत. अशातही काही ठिकाणी सरपंचपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याने सरपंचपदाचा पेच आजही कायम आहे. एकूणच अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार, हे मात्र सरपंच निवडीनंतरच कळणार आहे.

Web Title: Speed up the movement in the village as soon as the dates are announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.