विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रंगाची उधळण; कलगी अन् डफाची निघाली मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 06:43 PM2021-04-02T18:43:31+5:302021-04-02T18:44:11+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर - प्रतिवर्षीप्रमाणे रूढी व परंपरेनुसार मंदिरातील नित्योपचार व सण उत्सव खंड न पडता, शुक्रवारी पंढरपुरातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने रंगपंचमीनिमित्त कलगीची साध्या पध्दतीने मिरवणुक काढण्यात आली. दरम्यान, कलगीवाले यांचे मठामध्ये जावून पुजा करून मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी डफाची मिरवणुक काळा मारूती चौफाळा-पश्चिमव्दार- संत नामदेव पायरी अशा मार्गाने आण्यात आली तसेच मंदिर समितीतर्फे श्री. रूक्मिणी मातेच्या डफाची पुजा करण्यात आली.
त्यानंतर पोषाखावेळी कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेची पूजा करून देवाच्या अंगावर रंग उधळण्यात आला व त्यानंतर रंगाची मिरवणुक साध्या पध्दतीने मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली. तसेच श्रीं ना वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत पांढरा पोषाख घालण्यात आला त्याची आज सांगता करण्यात आली आणि आता उद्यापासून श्रीं ना रंगीत पोषाख घालण्यात येणार आहे.