‘लोकमत’च्या भूमिकेचं सर्वच समाजातून उत्स्फूर्त स्वागत; अनेकांनी केली प्रतिज्ञा, ‘पुढच्या वर्षी महाप्रकाश यात्रा !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:53 AM2019-01-16T10:53:39+5:302019-01-16T10:56:10+5:30

सोलापूर : ‘लोकमत’ची संकल्पना अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकारामुळे रविवारी तैलाभिषेक अन् सोमवारी अक्षता सोहळ्यानिमित्त निघालेली नंदीध्वज मिरवणूक लक्ष-लक्ष दिव्यांनी ...

Spontaneous reception from the community's role of 'Lokmat'; Many pledge, 'Mahaprakash Yatra next year!' | ‘लोकमत’च्या भूमिकेचं सर्वच समाजातून उत्स्फूर्त स्वागत; अनेकांनी केली प्रतिज्ञा, ‘पुढच्या वर्षी महाप्रकाश यात्रा !’

‘लोकमत’च्या भूमिकेचं सर्वच समाजातून उत्स्फूर्त स्वागत; अनेकांनी केली प्रतिज्ञा, ‘पुढच्या वर्षी महाप्रकाश यात्रा !’

Next
ठळक मुद्देसोलापूरकरांची सकारात्मक ऊर्जा विकासाला दिशा देणारी‘वीरशैव व्हिजन’च्या प्रकाशमय यात्रेचे कौतुकस्मार्ट सोलापूर होत असताना त्यात स्मार्ट शहरातील ही पहिलीच यात्रा आहे

सोलापूर : ‘लोकमत’ची संकल्पना अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकारामुळे रविवारी तैलाभिषेक अन् सोमवारी अक्षता सोहळ्यानिमित्त निघालेली नंदीध्वज मिरवणूक लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघाली. ३०-३५ वर्षांपूर्वी जशी यात्रा चालत होती, त्या यात्रेचं स्मरण दोन दिवसांमधील सोहळ्यावेळी भाविकांना झाले. लोकमतच्या नंदीध्वज झळाळीचे मान्यवरांनी कौतुक करताना पुढील वर्षी महाप्रकाश यात्रा साजरी करण्याचा संकल्प सोडताना इतरांनाही तसे आवाहन केले.

२ डिसेंबर २०१८ च्या हिरेहब्बू वाड्यात भक्तगणांच्या बैठकीत पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे, माजी नगरसेवक नंदकुमार मुस्तारे यांनी यात्रेला पुनश्च वैभव मिळवून देण्याचे सांगताना यंदा घरांवर, दुकानांवर, नंदीध्वज मार्गावर, प्रमुख चौकात विद्युत रोषणाई करण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन वीरशैव व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले आणि त्यांच्या टीमने एक आव्हान म्हणून स्वीकारले. १५-२० दिवसांपासून या टीमने जनजागृतीपर पत्रके वाटली. त्यास शहरातील सर्वच जाती-धर्मातील लोकांनी, व्यापाºयांनी, सेवाभावी संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काहींनी न सांगता केवळ ‘लोकमत’मध्ये येत असलेले नंदीध्वज झळाळी... हे वृत्त वाचून स्वत:हून प्रकाशमय यात्रेत सहभाग  घेतला. 

लोकमतमुळे ‘स्मार्ट सिटी-स्मार्ट यात्रा’
- ‘लोकमत’ची संकल्पना हाती घेऊन वीरशैव व्हिजनने घेतलेल्या पुढाकारामुळे प्रकाशमय यात्रेस जो प्रतिसाद मिळाला तो कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रिया विविध क्षेत्रांमधील मान्यवरांकडून ऐकावयास मिळाल्या. समतेच्या या प्रकाशमय यात्रेत राजकीय मंडळींचाही सहभाग ठळकपणे दिसून आला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील मान्यवरांनी ‘लोकमत’, वीरशैव व्हिजनच्या या प्रकाशमय यात्रेचे कौतुक करताना पुढील वर्षी महाप्रकाश यात्रा साजरी करण्याचे आवाहन तमाम सोलापूरकरांना केले. 

यंदा प्रकाशमय यात्रा अनुभवतोय- सुशीलकुमार शिंदे
- ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची सोलापूरकरांवर कृपा आहे. आजपर्यंत इथे कुठलेच नैसर्गिक संकट आले नाही. ही त्याची पुण्याई आहे. यंदा ‘लोकमत’ची संकल्पना अन् वीरशैव व्हिजनच्या पुढाकारातून सोलापूर शहर उजळून निघाले आहे. दिवाळीनंतरची दिवाळी साजरी होतेय. ही प्रकाशमय यात्रा मी अनुभवतोय, याचा विशेष आनंद असल्याचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा प्रकाश झोतात उजळून निघाली. हे श्रेय ‘लोकमत’ व वीरशैव व्हिजनला दिले पाहिजे. सोलापुरातील एकात्मतेचे दर्शन या प्रकाशमय यात्रेत घडल्याचा आनंद आहे.
-सिद्धाराम म्हेत्रे, आमदार 

महात्मा बसवेश्वरांचा संदेश शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेत दिसतो. यंदाची ही यात्रा लख-लख दिव्यांनी उजळून निघाली. ‘लोकमत’ची संकल्पना वीरशैव व्हिजनने यशस्वी केली.
-लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, 
शिवसेना सहसंपर्कप्रमुख

कधी नव्हे तो प्रकाशमय यात्रेचा आनंद तमाम सोलापुरातील भक्तगण घेताना दिसताहेत. सर्वच जाती-धर्मातील मंडळींनी ही यात्रा प्रकाशमय केली. यंदा प्रथमच सोलापुरात ‘लोकमत’ने यासाठी चांगलाच पुढाकार घेतला.
-दिलीप माने, माजी आमदार. 

सोलापुरात एकात्मतेचे दर्शन घडते. ‘लोकमत’ अन् वीरशैव व्हिजनमुळे यंदाच्या प्रकाशमय यात्रेत इथली एकात्मता उजळून निघाली. पुढच्या वर्षी महाप्रकाश यात्रा साजरी करण्याचा संकल्प करू या. 
-विष्णू निकंबे, माजी उपमहापौर.

‘लोकमत’ने संकल्पना मांडली आणि वीरशैव व्हिजनने केलेल्या आवाहनास मुस्लीम समाजही प्रकाशमय यात्रेत सहभागी झाला. पुढील वर्षी महाप्रकाश यात्रा साजरी होताना सर्वच जणांनी पुढे आले पाहिजे. 
- वीरभद्रेश बसवंती, भाजप नेते

यंदाची प्रकाशमय यात्रा साजरी होताना ‘लोकमत’ आणि वीरशैव व्हिजनचे कौतुकच केले पाहिजे. त्यामुळे यंदा विजापूर वेस, बेगमपेठ परिसरात लाईटिंगचे दर्शन घडताना रमजान ईद असल्याचा भास झाला.
-रफिक  हत्तुरे, नगरसेवक. 

 केवळ लिंगायत समाजच नव्हे तर सर्वच जाती-धर्मातील भक्तगण, प्रकाशमय यात्रेत सहभागी झाल्या. ‘लोकमत’, वीरशैव व्हिजनचे कौतुक करावे तेवढे कमीच. 

-राजशेखर शिवदारे, 

अध्यक्ष- स्वामी समर्थ सूतगिरणी.

‘लोकमत’ची संकल्पना खूपच आवडली. म्हणूनच मी माझे हॉटेल सिटी पार्क लख-लख दिव्यांनी उजळून टाकले आहे. इतर जाती-धर्मातील लोक प्रकाशमय यात्रेत सहभागी झाले, याचा अधिक आनंद आहे.
-महेश गादेकर, नेता, राष्ट्रवादी काँग्रेस. 

Web Title: Spontaneous reception from the community's role of 'Lokmat'; Many pledge, 'Mahaprakash Yatra next year!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.