बार्शीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:09+5:302020-12-09T04:18:09+5:30
बार्शी बाजार समितीमध्ये येणाऱ्या रोजच्या मालाची आवकदेखील झाली नाही बळीराजानेही या दिवशी बाजार समितीकडे कोणत्याही प्रकारच्या मालाची वाहतूक केली ...
बार्शी बाजार समितीमध्ये येणाऱ्या रोजच्या मालाची आवकदेखील झाली नाही बळीराजानेही या दिवशी बाजार समितीकडे कोणत्याही प्रकारच्या मालाची वाहतूक केली नाही. परिणामी, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार पूर्णतः ठप्प होते. शहरातील विविध भागांमध्ये व्यापाऱ्यांनी सर्वच प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सराफ दुकाने, कापड दुकाने, किराणा व भुसार मालाची दुकाने, स्टेशनरी अशा सर्व प्रकारच्या मालाची घाऊक व किरकोळ विक्री करणारी दुकाने बंद होती.
केंद्र सरकारने आणलेला कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी लाखो शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. सरकारसोबत चर्चा होऊनही प्रश्न सुटत नसल्यामुळे विविध शेतकरी संघटनांनी तसेच अनेक राजकीय पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती, दरम्यान महा विकास आघाडीने मार्केट यार्ड तुळजापूर रोड येथून पांडे चौक मार्गे तहसील कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढून एक दिवसीय बंदचा दुपारी तीन वाजता समारोप केला.
-----