कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग दिनास युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:51+5:302021-06-22T04:15:51+5:30
यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भारतीय प्राचीन शास्त्र योगाची माहिती पटवून दिली. यावेळी ...
यावेळी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भारतीय प्राचीन शास्त्र योगाची माहिती पटवून दिली. यावेळी योग प्रशिक्षक साहेबराव आरकिले, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अभय शहाणे यांचे मार्गदर्शन लाभले. करमाळा भाजप महिला आघाडीच्या वतीनेही योग दिन कार्यक्रम महिलांसाठी स्वतंत्र घेण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, महाराष्ट्र चॅम्पियन ऑफिसर जाधव, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, माजी शहर उपाध्यक्ष मच्छिंद्र फंड, भाजप महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस अश्विनी भालेराव, कल्पना भालेराव, पद्मजा भालेराव, पूजा रामनवमीवाले, अस्मिता जवकर, राधा येवले, राजश्री गवळी, वैष्णवी काळे, प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे, पाटील, प्रमोद फंड, गिरीश वाशिंबेकर, अक्षय कुंभार, मनोज मुसळे, संताजी घोरपडे, शिवाजी कुंभार, लक्ष्मण काळे, प्रसाद कोकीळ, विनोद इंदलकर, महादेव गोसावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
-----२१करमाळा-योगा
योग दिनानिमित्त योग करताना युवकवर्ग.