अकलूज बाजारपेठेत नागरिकांची तुरळक वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:24+5:302021-03-28T04:21:24+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व व्यापारी आस्थापने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत चालू ...

Sporadic bustle of citizens in Akluj market | अकलूज बाजारपेठेत नागरिकांची तुरळक वर्दळ

अकलूज बाजारपेठेत नागरिकांची तुरळक वर्दळ

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांनी सर्व व्यापारी आस्थापने सकाळी ७ ते सायंकाळी ७ या कालावधीत चालू ठेवण्याचे तसेच शनिवार व रविवार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यातून अत्यावश्यक सेवा व जिवनावश्यक दूध, फळे, भाजीपाला, किराण दुकाने आदी सुविधांना वगळण्याचे आदेश दिले. त्यानुसार अकलूज पोलिस स्टेशन व ग्रामपंचायतीने त्याबाबतच्या सूचना ध्वनिप्रक्षेपणाच्या माध्यमातून दिल्या होत्या. शुक्रवारी रात्रीच दुकानदारांनी आपली दुकाने ७ वा. बंद केली होती. शनिवारी अकलूज परिसरात अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यापाऱ्यांनी दुकाने पुर्णपणे बंद ठेवली. त्यामुळे बाजार पेठेत शुकशुकाट राहिला. नेहमीच गजबलेल्या रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती. तर दुपारनंतर कडक उन्हामुळे रस्ते निर्मनुष्य राहिले.

Web Title: Sporadic bustle of citizens in Akluj market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.