स्पोर्टस; १३ देशातील ५६ महिला खेळाडू सोलापुरात येणार; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर

By Appasaheb.patil | Published: December 15, 2023 12:56 PM2023-12-15T12:56:05+5:302023-12-15T12:57:52+5:30

सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले.

sports 56 women athletes from 13 countries will come to Solapur | स्पोर्टस; १३ देशातील ५६ महिला खेळाडू सोलापुरात येणार; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर

स्पोर्टस; १३ देशातील ५६ महिला खेळाडू सोलापुरात येणार; काय आहे नेमकं कारण? वाचा सविस्तर

सोलापूर : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रिसीजन , ओॲसिस,  इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन १७ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत एम. एस. एल. टी. ए. टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रिसिजन समूहाचे चेअरमन यतिन शहा व राजीव देसाई यांनी दिली. या स्पर्धेसाठी भारतासह १४ देशातून एकूण ५६ महिला सहभागी होणार असून यामध्ये २२ महिला खेळाडू या परदेशी असणार आहेत. 

सोलापूर व लगतच्या जिल्हयामध्ये लॉन टेनिस खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा व सोलापूरचे नांव जागतिक पातळीवर व्हावे या उद्देशाने या स्पर्धा आयोजित केल्याचे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजेश दमाणी यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय टेनीस फेडरेशनने इराणच्या समन हसानी यांची सामना पर्यवेक्षक तर राज्य संघटनेचे संयुक्त सचिव राजीव देसाई यांची सामना संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. या स्पर्धेसाठी पंच म्हणून अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेने श्रीराम गोखले (पुणे), सैकत रॉय (कलकत्ता), रोहित बालगवी (धारवाड), श्रध्दा दलि (मुंबई), रिया चाफेकर (पुणे), जॉय खलील (लेबनन), सोनम यंगचेन (भुतान) यांची नियुक्ती केलेली आहे.

या स्पर्धेसाठी इव्हेंट मॅनेजर संध्याराणी बंडगर, फिजिओथेरपीस्ट सलोनी सराफ (पूणे), साक्षी लालन (मुंबई) ट्रान्सपोर्ट कोऑर्डीनेटर पूजा संचेती ,वेलफेअर ऑफिसर मोनिका आळंद, भोजन व्यवस्था सुनंदा पवार पहाणार आहेत तर व्हेनू इन चार्ज म्हणून सुधीर सालगुडे व पूजा सालगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या आयोजनासाठी आशिष ढोले, अलि पंजवानी, मेहुल पटेल, ब्रिजेश गांधी, केशव रेडडी, सुहास अदमाने, श्रीधर देवसानी, असीम सिंदगी, राजेश पवार, अभिजीत टाकळीकर, सुनील मदान, डॉ वैभव मेरू, डॉ साजीद  सय्यद, उज्वल कोठारी, संदीप देसाई, परेश शहा, संतोष फाठक यांचे सहकार्य लाभले.

Web Title: sports 56 women athletes from 13 countries will come to Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.