मोहोळमध्ये क्रीडा संकुल करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:21 AM2021-03-21T04:21:27+5:302021-03-21T04:21:27+5:30

शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजारांपर्यंत आहे. शिवाय शहर हे ग्रामीण भागातील गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात एक वरिष्ठ महाविद्यालय, ...

Sports package should be done in Mohol | मोहोळमध्ये क्रीडा संकुल करावे

मोहोळमध्ये क्रीडा संकुल करावे

googlenewsNext

शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजारांपर्यंत आहे. शिवाय शहर हे ग्रामीण भागातील गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात एक वरिष्ठ महाविद्यालय, पाच कनिष्ठ महाविद्यालये व अन्य माध्यमिक विद्यालये आहेत. शहरात शिक्षण घेणाऱ्या या शिक्षण संस्थांमधून आजवर अनेक विद्यार्थी हॉलीबॉल, कबड्डी, खोखो, कुस्ती, क्रिकेट, रनिंग, कराटे, तायक्वांदो यासारख्या खेळाच्या माध्यमातून राज्यात व देशपातळीवर चमकले आहेत. या खेळाडूंना सुविधा उपलब्ध नसतानाही त्यांनी मोहोळ शहराचा नावलौकिक वाढलेला आहे. त्यामुळे मोहोळ शहरात अथवा शहरालगत सर्व सोयींनीयुक्त क्रीडा संकुल उभारले गेले तर हे खेळाडू भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील चमकू शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात नागेश वनकळसे यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांना निवेदन दिले होते. यावर त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये क्रीडा संकुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या क्रीडा संकुलाचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविला गेलेला नाही.

शहर हद्दीत जागा उपलब्ध

यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी तात्काळ मोहोळ शहरातीलच जागेचा प्रस्ताव पाठवावा, अशा मागणीचे निवेदन शहरातील खेळाडूंनी तहसीलदार जीवन बनसोडे यांना दिले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, नगरसेवक सत्यवान देशमुख, भांबेवाडीचे माजी सरपंच केशव वाघचवरे, बाल खेळाडू सार्थक लखदिवे, यशवर्धन वनकळसे, प्रणव झाडे, विराज सूळ, प्रदीप भोसले, अभिजित खरात, सुमित सुतार, अंशू शिंदे, प्रांजली झाडे उपस्थित होते.

फोटो

२० मोहोळ-स्पोर्ट

ओळी

क्रीडासंकुल शहरातच व्हावे या मागणीचे निवेदन तहसीलदार जीवन बनसोडे यांना देताना खेळाडू व शिवसेनेचे पदाधिकारी.

Web Title: Sports package should be done in Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.