On The Spot; अवघ्या बारा तासात उभारला गेला १७० फुटी लोखंडी पूल; चार क्रेनमधून ४५ फूट उंचावर स्थिरावला ८० टनी सांगाडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:40 PM2019-03-06T12:40:21+5:302019-03-06T12:44:06+5:30
काशिनाथ वाघमारे सोलापूर : मागील पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेणाºया सोलापूर -पुणे महामार्गावर मडकीवस्तीजवळ गणेशनगर-वारदनगर यांना जोडणारा शहरातील ...
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : मागील पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेणाºया सोलापूर-पुणे महामार्गावर मडकीवस्तीजवळ गणेशनगर-वारदनगर यांना जोडणारा शहरातील पहिला पादचारी पूल उभारण्याचे काम राष्ट्रीय महामार्गाने मंगळवारी हाती घेतले़ दिवसभरातील १२ तासात जमिनीपासून ४५ फूट उंचीवर ८० टनाचा हा पूल उभारला गेला.
येत्या सात दिवसांत हा पूल पादचाºयांसाठी खुला केला जाणार आहे. सकाळी १० वाजता लोखंडी पूल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली़ चार मोठे क्रेन आणि मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाच्या मदतीने पूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले़ तत्पूर्वी पुणे नाका चौकातून वाहतूक अन्य मार्गावरुन वळवण्यात आली़ या चौकात वाहतूक पोलीस तैनात होते़ पुलावर वाहनांची लांबलचक लागलेली रांग निदर्शनास आली.
गेल्या काही दिवसांपासून रस्ता पार करताना अनेकांना अपघाताचा अनुभव घ्यावा लागला़ दोन्ही नगरातून ये-जा करणाºया नागरिकांना जीव मुठीत धरुन रस्ता पार करावा लागत आहे.
आंदोलन, मोर्चानंतर राष्ट्रीय महामार्गाने या रस्त्यावर गणेशनगर-वारदनगरला जोडण्यासाठी लोखंडी पादचारी पूल उभाण्याचा निर्णय घेतला़ पुणे-सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीने हे काम स्वीकारले़ आज सकाळी सुुरु झालेले काम दुपारी अडीच वाजता थांबले़ या साडेसहा तासांत पुलाचे अर्धे काम झाले़ रहदारीची समस्या लक्षात घेता उर्वरित अर्धे काम सायंकाळी चार वाजता सुरू करण्यात आले. रात्री ८.३० वाजता हे काम संपले. आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी आणि ज्योती बमगोंडे आदी नगरसेवकांची याठिकाणी उपस्थिती होती.
१७० फूट लांबीचा ८० टन ब्रीज
- हा लोखंडी पूल उभारण्यासाठी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह चारही नगरसेवकांनी यापूर्वी आंदोलने केली होती़ रास्ता रोको, मोर्चेनंतर पोलीस आयुक्तांनी दोन वेळा तर राष्ट्रीय महामार्गने चार वेळा बैठक घेतली़ तीन वेळा या ठिकाणी अधिकाºयांनी भेटी दिली़ जमिनीपासून ४५ फुट उंचीवर ८० टन वजनाचा आणि १७० फूट लांबीचा पूल उभारला जात आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षार्थींना केले मार्गस्थ
- सकाळी दहा वाजता वाहतूक संथ गतीने सुरु होती़ याचवेळी जड वाहतुकीमुळे दोन्हीकडची वाहतूक थांबली़ अशातच एका रिक्षातून दहावी आणि बारावीची परीक्षा द्यायला निघालेल्या विद्यार्थ्यांना रस्ता मोकळा होत नसल्याने तोंड काळवंडले़ चिंतातूर मुद्रा पाहता काही नागरिकांनी आणि प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी स्वत:च्या दुचाकीवरुन पुणे नाक्यावर सोडले़ कोणीतरी गर्दीतून बाहेर काढून परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यास मदत करतंय हे पाहून हे परीक्षार्थींच्या चेहºयावर हसू उमलले.
वाहतूक थांबवली
- पूल उभारत असताना अपघात होऊ नये म्हणून प्रारंभी एका भागावरची वाहतूक बंद करण्यात आली़ दुसºया बाजूला एकेरी पद्धतीने वाहतूक सुरु ठेवण्यात आली़ सकाळी ८़३० वाजता सुरु केलेल्या पुलाचे काम रात्री ८़३० वाजता थांबवले गेले़