बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक लसीकरण केंद्र; तीन जिल्ह्यातील पहिले केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:26 AM2021-09-05T04:26:32+5:302021-09-05T04:26:32+5:30

भविष्यकाळात कोविड-१९ या आजाराच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे शक्य तितक्या लवकर कोविड लसीकरण होणे गरजेचे आहे ...

Sputnik Vaccination Center at Sushruta Hospital in Barshi; The first center in three districts | बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक लसीकरण केंद्र; तीन जिल्ह्यातील पहिले केंद्र

बार्शीतील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक लसीकरण केंद्र; तीन जिल्ह्यातील पहिले केंद्र

Next

भविष्यकाळात कोविड-१९ या आजाराच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे शक्य तितक्या लवकर कोविड लसीकरण होणे गरजेचे आहे म्हणून बार्शीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. मात्र, स्पुतनिक लस अद्याप उपलब्ध झाली नव्हती. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांत केवळ या हॉस्पिटलमध्ये ती उपलब्ध असणार आहे.

यावेळी डॉ. बी. वाय. यादव, शल्यचिकित्सक डॉ. विजय अंधारे, आयएमएचे राज्य सचिव डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. गुलाबराव पाटील, डॉ. विवेकानंद जानराव, डॉ. प्रशांत मोहिरे, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, रोटरीचे विक्रम सावळे, लायन्सचे अजित देशमुख, डॉ. एच. सी. माने, मेडिकल असो.चे सुधीर राऊत उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते.

18 वर्षांवरील सर्व नागरिकांकरिता ही लस उपलब्ध असणार आहे, असे लसीकरण समन्वयक डॉ. अजित सगरे यांनी सांगितले. डॉ. बी. वाय. यादव यांनी डॉ. अंधारे यांनी कोरोना काळात झोकून देऊन काम केल्याचे स्पष्ट केले. सूत्रसंचालन किरण गाढवे यांनी केले. आभार डॉ. महादेव कोरसाळे यांनी मानले. (वा. प्र.)

Web Title: Sputnik Vaccination Center at Sushruta Hospital in Barshi; The first center in three districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.