सोलापूरातील राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये एसएससीबी तर मुलींमध्ये केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 05:31 PM2017-12-26T17:31:47+5:302017-12-26T17:36:51+5:30

केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत  सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

SSCB among boys in the national fencing championship competition in Solapur and Kerala general secretary for girls | सोलापूरातील राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये एसएससीबी तर मुलींमध्ये केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद

सोलापूरातील राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये एसएससीबी तर मुलींमध्ये केरळ संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Next
ठळक मुद्दे महाराष्ट्र मुलांच्या संघाची ४१ वर्षात प्रथमच विजेतेपदाला गवसणी१७ गुणासह पंजाब राज्याने द्वितीय तर १४ गुणासह मणिपूर राज्याने तिसरा क्रमांक पटकावला.सोलापुरात झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक तिसरा क्रमांक मिळवून प्रथमच विजेतेपद पटकावले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २६ :  केगाव येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथे घेण्यात आलेल्या २८ व्या वरिष्ठगट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत  सायबर प्रकारात मुलांमध्ये एसएससीबी अर्थात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डने तर मुलींमध्ये केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुलांमध्ये महाराष्ट्र संघाने तब्बल ४१ वर्षात प्रथमच वरिष्ठ गट स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली.
        मंगळवारी दुपारी झालेल्या मुलांच्या सांघिक सायबर प्रकारातील अंतिम सामन्यात एसएससीबी संघाने जम्मू काश्मीर संघावर ४५-३० गुणाने मात करत  विजय संपादन केला.विजेत्या संघाकडून आय सुरेंद्रो, जीशो निधी,प्रवीण आणि कुशाल यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत जम्मू काश्मीर संघाच्या विशाल थापर,जावेद अहमद चौधरी, प्रदीप कुमार आणि वंश महाजन यांचा प्रतिकार परतवून लावला आणि मोठ्या फरकाने सामना जिंकला.
        मुलांमध्ये ३० गुणासह एसएससीबी संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.त्यानंतर १५ गुणासह राजस्थान द्वितीय आणि ८ गुणासह महाराष्ट्र राज्याने तिसरा क्रमांक पटकावला.भारतात १९७४ साली तलवारबाजी खेळाला सुरुवात झाली.तेव्हापासून आतापर्यंत म्हणजेच तब्बल ४१ वर्षात महाराष्ट्राला वरिष्ठ गटाचे विजेतेपद मिळाले नव्हते.सोलापुरात झालेल्या स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने ऐतिहासिक तिसरा क्रमांक मिळवून प्रथमच विजेतेपद पटकावले असल्याचे महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे खजिनदार अशोक दुधारे यांनी सांगितले.
        केगावच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस अधीक्षक कविता नेरकर - पवार आणि सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक संजय नवले यांच्या हस्ते विजेत्या संघांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना ट्रॉफी तसेच मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.सिंहगड कॅम्पस परिसरातील उत्कृष्ट वर्तणुकीबद्धल एसएससीबी मुले आणि छत्तीसगड राज्याला भारतीय तलवारबाजी महासंघाचे खजिनदार अशोक दुधारे, सरचिटणीस बशीर खान , संजय नवले तसेच प्राचार्य डॉ.शंकर नवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.मुलींमध्ये ३० गुणासह केरळ राज्याने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. १७ गुणासह पंजाब राज्याने द्वितीय तर १४ गुणासह मणिपूर राज्याने तिसरा क्रमांक पटकावला.
       यावेळी महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश काटूळे, सचिव डॉ.उदय डोंगरे,सिंहगडचे उपप्राचार्य प्रकाश नवले,राजेंद्र माने,सुहास छंचुरे,प्रा.रविंद्र देशमुख, प्रा.करीम मुजावर आदी उपस्थित होते.
 

Web Title: SSCB among boys in the national fencing championship competition in Solapur and Kerala general secretary for girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.