तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; दहा प्रवासी जखमी

By Appasaheb.patil | Published: November 26, 2023 11:19 AM2023-11-26T11:19:10+5:302023-11-26T11:19:47+5:30

सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी एसटी बस पहाटे निघाली होती.

ST bus accident on Tuljapur highway; Ten passengers injured in solapur | तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; दहा प्रवासी जखमी

तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; दहा प्रवासी जखमी

आप्पासाहेब पाटील 

सोलापूर : धावत्या एसटी बसचं चाक निघाल्याने बस थेट दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात दहा प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. हा अपघातसोलापूर - तुळजापूर रोडवरील उळे गावाजवळ घडला.

सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी एसटी बस पहाटे निघाली होती. मात्र सोलापूर जवळील उळे - कासेगाव या गावाजवळ एसटी बसचं मागील चाक अचाकन बसपासून वेगळं झालं. बस वेगात असल्याने चाक निखळल्यानंतर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं त्यानंतर बस महामार्गावर रस्त्याच्या कडेला जाऊन धडकली. बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत असल्याने सर्वांनाच एक थरारक अनुभव आला. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते, त्यानंतर अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यासाठी मोठी मदत केली.

Web Title: ST bus accident on Tuljapur highway; Ten passengers injured in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.