मोडनिंबजवळ एसटी बस पलटी, चार प्रवासी जखमी, पाठीमागून येणाºया ट्रकने दिली धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 04:38 PM2017-12-27T16:38:30+5:302017-12-27T16:41:44+5:30
सोलापुर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालट्रकची पाठीमागुन धडक बसल्याने मोडनिंबजवळ एसटी पलटी झाली़ यात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़
आॅनलाइन लोकमत सोलापूर
मोडनिंब दि २७ : सोलापुर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालट्रकची पाठीमागुन धडक बसल्याने मोडनिंबजवळ एसटी पलटी झाली़ यात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती पोलीसांनी दिली़
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार २७ डिसेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास सोलापुरहुन पुण्याकङे निघालेली प्रवाशी बस उमरगा - ठाणे ही मोडनिंबजवळ आली़ यावेळी मोडनिंब बस स्थानकात येण्यासाठी हायवेवरून सव्हिस रोडकडे वळत असताना बस नंबर एमएच १२ बीटी २३३९ या बसला पाठीमागुन सोलापुरहुन पुण्याकङे निघालेला मालट्रक नंबर एमएच १२ एमव्ही या ट्रकची पाठीमागील बाजुस जोराची धङक बसली़ या धडकेत बस पलटी झाली़ त्यामुळे बसमधील चारजण जखमी झाले़ या जखमींना उपचारासाठी सोलापुर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ यात घनशाम शिंदे, संतोष गलांडे (दोघेही रा.सोलापुर), हनुमंत पाचवे (रा.कुरूल ता.मोहोळ), यशोदा जाधव (रा.शहापुर ता.तुळजापुर) अशी आहेत. सदर ठिकाणी यापुर्वी बसेसचे अपघात झाले असुन एकावेळी तर बस वळवताना दोनजण समोरून मोटारसायकलवर जाणारे जागीच ठार झाले होते.
मोङनिंब बसस्थानकात बसेस हायवेवरून स्थानकाकडे वळवुन नेताना कसरत करावी लागत आहे़ जर बसस्थानकाकङे जाणाºया व येणाºया बसेससाठी पर्यायी व्यवस्था न झाल्यास असेच अपघात घडत राहतील तरी वरीष्टांनी याची दखल घेवुन पर्याय काढावा अशी मागणी जोर धरत आहे़