वडाळा येथे एसटी बसेस जाळल्या, मराठा समाज आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 14:29 IST2018-07-21T14:27:12+5:302018-07-21T14:29:45+5:30

वडाळा येथे एसटी बसेस जाळल्या, मराठा समाज आक्रमक
सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ वडाळा, गावडी दारफळ (ता़ उत्तर सोलापूर) येथे अज्ञातांनी दोन एसटी बस पेटवून दिली तर एक एसटी बस फोडली़ यावेळी काही काळ दगडफेकही करण्यात आली़ हा प्रकार सोलापूर-बार्शी महामार्गावरील लोकमंगल महाविद्यालय परिसरात घडली़
या घटनेनंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली असून आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले़ शनिवारी सकाळपासून सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन, रास्ता रोको, चक्काजाम, मुंडण आंदोलन सुरू आहे़