रखडलेल्या पगारासाठी एसटी कामगार युनियनची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:27 AM2021-09-04T04:27:05+5:302021-09-04T04:27:05+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे, २०२१ पासून नियमित तारखेला वेतन मिळत नाही. जुलै, २०२१चे वेतन औद्योगिक न्यायालयाने १४ ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे, २०२१ पासून नियमित तारखेला वेतन मिळत नाही. जुलै, २०२१चे वेतन औद्योगिक न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी आदेश देऊनही आजपर्यंत दिले नाही. कमी वेतन आणि पगार वेळेवर होत नसल्याने, महामंडळातील काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्यासारखे गंभीर पाऊल उचलले आहे. याबाबत महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी आगारासमोर कोरोना नियमांचे पालन करत निदर्शने केल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
यावेळी डेपो अध्यक्ष राजेंद्र म्हेत्रे, सचिव आशिषकुमार वाघमारे, अशोक चव्हाण, सतीश शिंगाडे, खंडू शिंदे, कुकडे महाराज, उपाध्यक्ष शिवाजी लोखंडे उपस्थित होते.
फोटो ओळी ::::::::::::::::::::
मंगळवेढा आगारासमोर निदर्शन करताना, संघर्ष एसटी कामगार युनियनचे पदाधिकारी.