दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:16 AM2020-12-07T04:16:28+5:302020-12-07T04:16:28+5:30
बार्शी : राज्यात समाजकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जात असलेल्या दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन लागू करण्याच्या ...
बार्शी : राज्यात समाजकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जात असलेल्या दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन लागू करण्याच्या मागणीचे निवेदन राजीव स्मृती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेतर्फे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले.
यावेळी दिव्यांग शाळेतील लतीब शेख, आप्पा बसाटे, गणेश जगताप, अमोल बंगाळे, संजय सावंत, शरद ताकभाते, नितीन शिंदे, मिलिंद जाधव, इस्माईल शेख, धनंजय जगदाळे, मोहन लोहार, सादीक पठाण उपस्थित होते.
निवेदनात म्हटले, राज्यात मतिमंद, मूकबधिर, अंध व अस्थिव्यंग प्रवर्गाच्या २ हजार शाळा आहेत. या दिव्यांग शाळेत २५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना ७ वा वेतन लागू करण्यासाठी वेळोवेळी मागणी करूनही दिव्यांग शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मात्र लागू केला नाही. याबाबत मंत्रालयातील सामाजिक न्याय व अर्थ विभागाने यातील असलेल्या त्रुटी काढूनही सातवा वेतन लागू केलेला नाही. त्यामुळे आपण तरी लक्ष घालावे, अशी मागणी केली. ते निवेदन स्वीकारून प्रवीण दरेकर यांनी ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.