सुविधा कक्षात उमेदवारांना कर्मचारी करणार मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:50+5:302020-12-25T04:18:50+5:30
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सुविधा कक्ष स्थापन ...
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी सुविधा कक्ष स्थापन करण्यात आला आहे अर्ज बिनचूक भरण्यासाठी या कक्षात उमेदवारांना कर्मचारी मदत करतील.
तालुक्यात ५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे तहसील कार्यालयात अपुरी जागा असल्याने ही प्रक्रिया पार्क चौकातील नार्थकोट हायस्कूलमध्ये पार पाडली जात आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच भौगोलिक दृष्ट्या तालुक्यातील उत्तर आणि दक्षिण भागातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी ही जागा निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी विधानसभा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी विजापूर रोडवरील एस आर पी कॅम्प मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात होती. तहसीलदार अमोल कुंभार यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे आणि सुटसुटीतपणे हाताळण्यासाठी निवडणूक कार्यालयात सुविधा कक्ष स्थापन केला आहे.
या कक्षात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, उमेदवारानी भरलेले अर्ज तपासणे त्यातील त्रूटी निदर्शनास आणून देणे आणि अर्ज परिपूर्ण झाल्यानंतर दाखल करण्याची व्यवस्था या सुविधा कक्षात करण्यात आली आहे. मंडलाधिकारी गाव कामगार तलाठी आणि निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याकडून उमेदवारांना या सुविधा कक्षात मार्गदर्शन मिळणार आहे.
--------
दोन दिवसात १० अर्ज
दोन दिवसांत १३ अर्ज दाखल
बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सुनील ब्रह्मानंद कळके मुस्ती यांचे दोन अर्ज तर गौतम शकुंबर चौधरी असे तीन अर्ज दाखल झाले. गुरुवारी दहा अर्ज दाखल झाले त्यात बक्षी हिप्परगे , कुरघोट, औराद,तांदुळवाडी, मुस्ती (प्रत्येकी दोन अर्ज) असे १० अर्ज दाखल करण्यात आले.
----
नॉर्थकोट हायस्कुलमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे