भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:21 AM2021-03-06T04:21:28+5:302021-03-06T04:21:28+5:30
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाची पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद आहे. ...
मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागाची पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या सात ते आठ महिन्यांपासून बंद आहे. यासाठी शैला गोडसे यांनी पाठपुरावा केला. त्यांनी राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जाऊन पाठपुरावा केला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून ही योजना त्वरित चालू करण्यासंदर्भात सूचना केल्याचे गोडसे यांनी सांगितले.
योजना सुरु झाल्याशिवाय शांत बसणार नाही
मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील ३९ गावांची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सात महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही योजना तातडीने सुरू करावी. अनेक दिवसांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. ही योजना सुरू झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी स्पष्ट केले.
फोटो ओळी-०५पंढरपूर-गोडसे
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासंदर्भात शैला गोडसे यांनी निवेदन दिले.