पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करा : शिवतेजसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:30+5:302021-04-14T04:20:30+5:30
माळशिरस तालुक्यात १००४ कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत, तर आणखी ९४५६ रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. ८२७४ रुग्ण ...
माळशिरस तालुक्यात १००४ कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत, तर आणखी ९४५६ रुग्णांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. ८२७४ रुग्ण या आजारातून बरे झाले असले तरी १७४ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तालुक्यातील बहुतांश हॉस्पिटल्स पूर्ण क्षमतेने रुग्णांवर उपचार करत आहेत. त्यामुळे नवीन रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत. शिवाय महाळुंग येथील कोविड केअर सेंटर येथे १०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता असताना येथेही ७०पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे येथेही लवकरच बेड उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने अकलूज येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या प्रशस्त इमारतीत ४०० ते ५०० बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी केली आहे.
कोट ::::::::::::::::::
उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी शमा पवार यांच्याकडून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येईल.
- डॉ.रामचंद्र मोहिते
तालुका आरोग्य अधिकारी, माळशिरस