सहा तालुक्यांत व्यवहार सुरू, उर्वरित पाच तालुक्यांत बाजारपेठ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:25 AM2021-09-24T04:25:50+5:302021-09-24T04:25:50+5:30
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता या पाच तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहा दिवसांचा लॉकडाऊन टाकण्यात आला होता. तसेच ...
मध्यंतरीच्या कालावधीमध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता या पाच तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दहा दिवसांचा लॉकडाऊन टाकण्यात आला होता. तसेच त्यानंतर सकाळी सात ते सायंकाळी चार या वेळेमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार अद्याप सर्व व्यवहार बंद होते. त्यानंतर आमदार बबनराव शिंदे यांनी तत्काळ पालकमंत्र्यांकडे संपर्क साधून दोन तासांचा वेळ वाढवून दिला. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे पूर्ण वर्ष वाया गेले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे. तरी अन्य सहा तालुक्यांप्रमाणे आम्हालाही सकाळी ७ ते सायंकाळी नऊपर्यंत शासन व प्रशासनाने व्यवसाय चालवण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी पाचही आमदारांकडे व्यापा-यांनी केली आहे. यावेळी मोडनिंबचे कापड व्यापारी सुधीर सुर्वे, सुकुमार शहा, प्रसाद आमले, ऋषिकेश मुळीक, संतोष नरखेडकर यांनी व्यथा मांडल्या.
................
आश्वासन मिळाले, प्रतीक्षा कार्यवाहीची
माढा, करमाळा, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांच्या आमदारांनी पालकमंत्री व जिल्हाधिका-यांची चर्चा करून निर्बंध उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याची प्रत्यक्ष कार्यवाही कधी होणार, अशी विचारणा आता व्यापा-यांमधून होत आहे.