विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस अत्याधुनिक रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:15 AM2021-07-22T04:15:07+5:302021-07-22T04:15:07+5:30
यावेळी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष श्री. ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला एक ...
यावेळी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष श्री. ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात यावी, अशी मागणी आम्ही डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडे केली होती. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णवाहिका मिळत असल्याचा विशेष आनंद होत आहे. रुग्णवाहिका पंढरपूर परिसरातील गरजू रुग्णांना आधार ठरेल, असा विश्वास औसेकर महाराज यांनी व्यक्त केला. समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी रुग्णवाहिका दिल्याबद्दल डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनचे सर्वेसर्वा आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी संयुक्तपणे संपादित केलेल्या वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथाच्या प्रति मुख्यमंत्री यांच्यासहीत उपस्थित सर्व मान्यवरांना भेट देण्यात आल्या.
---
फोटो : २१ करमाळा
विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस अत्याधुनिक रुग्णवाहिकेची चावी मंदिर समितीचे औसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे.