भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सोलापूर दौरा स्थगित
By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 3, 2022 01:25 PM2022-12-03T13:25:35+5:302022-12-03T13:25:56+5:30
बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शांतीसागर मंगल कार्यालयात शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे गुरुवार, ८ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर होते. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा सोलापूर दौरा स्थगित झाला असून पुढील नवीन दौरा १४ डिसेंबर नंतर समजणार आहे, अशी माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर येथील शांतीसागर मंगल कार्यालयात शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांचा दौरा स्थगित झाल्याची माहिती देण्यात आली. या वेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, माजी अध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, सरचिटणीस शशी थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.