शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख
By admin | Published: March 18, 2017 08:08 PM2017-03-18T20:08:46+5:302017-03-18T20:08:46+5:30
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख
शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सादर केला राज्याचा अर्थसंकल्प : सहकारमंत्री सुभाष देशमुख
सोलापूर : सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प सर्वांच्या हिताचा आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून सर्वसमावेश अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रीया सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली. या अर्थसंकल्पात शेतकरी गट, शेतकरी कंपन्या अधिक बळकट करण्यासाठी २०० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतातून शेतमाल काढल्यानंतर तातडीने आडत्याला विकण्याऐवजी तो तारण ठेवून, पैशांची गरज भागावी आणि बाजारपेठेतील गरजेनुसार शेतमालाला योग्य आणि वाजवी दर मिळावा या उद्देशाने शेतमाल तारण योजनेसाठी ५० कोटी, आणि ग्रो मार्केटसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे मिलवाईज निर्यात कोठा पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांना सन २०१५-१६ चा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित होते. केंद्र शासनाने साखर कारखान्याबाबतचे निर्यात कोटा धोरण मागे घेतले असल्याने सन २०१५-१६ या वषार्साठी नियार्तीची अट असणार नाही. शेतकऱ्यांना रास्त किफायतशीर भाव देता यावेत. याकरिता सन २०१५-१६ आणि २०१५-१६ साखर कारखान्यांचा ऊस खरेदीकर माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. दोन्ही वषार्चा एकत्रित विचार करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर भाव देण्याकरीता कारखान्यांकडे रु.७०० कोटी उपलब्ध होणार आहेत, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले. याचबरोबर कोकणात काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून नवीन गोदाम बांधकामासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.
एकंदरीत उद्योग, व्यवसाय, शिक्षण, शेती व रोजगार यासाठी सरकारने भरघोस निधी दिला आहे. राज्याचा विकासदर वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. राज्यातील ८२ हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचा निर्धारसुद्धा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांना उत्पन्न दुपट्ट वाढवून कर्जमुक्त करण्याचे स्वप्न सरकारचे आहे. सोलापूर विमानतळाचा विकास आणि सोलापुरी चादर व टॉवेल करमुक्त करण्यात आले आहेत त्यामुळे सोलापूरच्या रोजगाराला व विकासाला चालना मिळणार आहे. एकूणच अर्थसंकल्पामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करून व शेतकऱ्यांच्या भवितव्याचा विचार करून झुकते माप दिले आहे. अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून स्वागतार्ह आहे.