सोलापूर जिल्ह्यातील राज्य कर्मचाºयांची आषाढी सुट्टी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 06:03 PM2018-07-20T18:03:14+5:302018-07-20T18:13:51+5:30
सोलापूर :परंपरेनुसार आषाढी एकादशीदिवशी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाºयांना देण्यात येणारी सुट्टी यंदाच्या वर्षी जिल्हा प्रशासनाने रद्द केली़ आहे़ वार आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरात येतात़ या वारकºयांना सेवासुविधा पुरविण्यासाठी सर्वच शासकीय यंत्रणांची गरज असते़ त्यामुळे ही सुट्टी रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले़ त्यामुळे सोमवार २३ जुलै रोजी सर्वच शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत़ दरवर्षी जिल्हाधिकारी हे आषाढी एकादशीदिवशी सोलापूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाºयांना सुट्टी जाहीर करतात़
दरम्यान, दरवर्षी जिल्हाधिकारी हे पंढरपूरच्या आषाढी वारीला राज्य कर्मचाºयांना सुट्टी जाहीर करतात़ मात्र वारीत सर्वच यंत्रणांनी कामे करणे गरजेचे असते त्यामुळे राज्य कर्मचाºयांची सुट्टी रद्द करण्यात आली़ यंदाच्या वर्षी ही परंपरा खंडीत करण्यात आल्याने राज्य कर्मचाºयांमध्ये कही खुशी कही गम असे चित्र दिसून येत आहे़
निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली म्हणाले की, आषाढी एकादशीचा सोहळा खुप महत्वाचा आहे़ त्यादिवशी महसुल, जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय कार्यालयामधील अधिकारी व कर्मचाºयांची आवश्यकता असते़ वारीच्या प्रत्येक कामात त्यांची मदत आवश्यक असते़ त्यामुळे यावर्षी ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे़ पंढरपूरातील शाळांना आठ दिवस सुट्टी असते उर्वरित ठिकाणी काय करायचे याबाबतचा निर्णय शिक्षणाधिकाºयांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले़