राज्य सरकारने मराठा ना ओबीसींचे आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:56+5:302021-06-27T04:15:56+5:30
शनिवारी बार्शी येथील पोस्ट चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आ. राजेंद्र ...
शनिवारी बार्शी येथील पोस्ट चौकामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आ. राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. बाबासाहेबांनी सर्व वंचित घटकांना न्याय देण्यासाठी घटनेची निर्मिती केली. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये कुणाचा कुणाला मेळ नाही, अशी टीका आ. राऊत यांनी केली आहे.
सरकारने योग्य भूमिका घ्यावी
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबद्दल सरकार गंभीर नाही. मात्र, सरकारने योग्य ती भूमिका घेत हे ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष ॲड. आसीफ तांबोळी, पं. स. सभापती अनिल डिसले, कौरव माने, अशोक सावळे, भाजप तालुका अध्यक्ष मदन दराडे, शहर अध्यक्ष महावीर कदम, पक्षनेते विजय राऊत, प्रमोद वाघमोडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशव घोगरे, भाजपा महिला उपाध्यक्ष ॲड. राजश्रीताई डमरे, शहराध्यक्ष रूपालीताई ढगे, पद्मजाताई काळे, गटनेते दीपक राऊत, प्रशांत कथले, संदेश काकडे, संतोष बारंगुळे, विजय चव्हाण, महेश जगताप, समाधान डोईफोडे, अविनाश मांजरे, धनंजय जाधव, नानासाहेब धायगुडे, शिवाजी सुळे, शकील मुलाणी, ओबीसी सेल तालुका तालुका अध्यक्ष विजयकुमार माळी, व्यंकटेश ढेंगळे-पाटील, प्रशांत खराडे, किरण कोकाटे आदी उपस्थित होते.
चक्का जाम आंदोलनानंतर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी आंदोलनाच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
===Photopath===
260621\img-20210626-wa0018.jpg~260621\1730-img-20210626-wa0019.jpg
===Caption===
बार्शीत भाजपचे मराठा व ओबीसींच्या आरक्षण प्रश्नी चक्काजाम आंदोलन ; आमदार राजेंद्र राऊत यांचा सहभाग
~बार्शीत भाजपचे मराठा व ओबीसींच्या आरक्षण प्रश्नी चक्काजाम आंदोलन ; आमदार राजेंद्र राऊत यांचा सहभाग