राज्याचे आरोग्यमंत्री आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर; जाणून घ्या दौऱ्याविषयी सविस्तर
By Appasaheb.patil | Published: September 5, 2022 10:53 AM2022-09-05T10:53:01+5:302022-09-05T10:53:07+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत हे आज ५ सप्टेंबर २०२२ सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात ते विविध ग्रामीण व शासकीय रूग्णालयांना भेटी देऊन रूग्णांशी ते उपचार व सेवासुविधांविषयी संवाद साधणार आहेत. जाणून घ्या त्यांच्या आजच्या दिवसभरातील दौऱ्याविषयी सविस्तर...
- - सकाळी ७ वाजता - कात्रज, पुणे निवासस्थान येथून नातेपुते (ता. माळशिरस) कडे प्रयाण
- - सकाळी १०.३० वाजता - नातेपुते येथे आगमन, शासकीय रूग्णालयास भेट, शिवसेना कार्यालयाचे उदघाटन, कोविड योध्दा सन्मान कार्यक्रमास उपस्थिती, राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश
- - दुपारी ११.४५ वाजता - माळशिरसकडे प्रयाण
- - दुपारी १२.०५ वाजता - माळशिरस येथे आगमन, संतोष वाघमोडे व इतर यांचा पक्ष प्रवेश व सत्कार समारंभ, शासकीय रूग्णालयास भेट
- - दुपारी १२.३० वाजता - पंढरपूरकडे प्रयाण
- - दुपारी १.१५ वाजता - पंढरपूर येथे आगमन, विठ्ठल मंदिर दर्शन, पालखी महामार्ग भूसंपादन अधिकारी बैठक, शासकीय उपजिल्हा रूग्णालयास भेट
- - दुपारी २.५० वाजता - पेनूर (ता. मोहोळ) कडे मोटारीने प्रयाण
- - दुपारी ३.१० वाजता पेनूर येथे आगमन, ग्रामपंचायत कार्यालय भेट, भैरवनाथवाडी येथे ग्रामस्थ व शेतकरी भेटी
- - दुपारी ४ वाजता - सोलापूरकडे प्रयाण
- - सायंकाळी ५ वाजता - सोलापुरात आगमन, शासकीय रूग्णालयास भेट, रूग्णांशी संवाद, विविध गणेश मंडळांना भेटी व व अन्य कार्यक्रमास उपस्थिती
- - सायंकाळी ७ वाजता - शासकीय विश्रामगृहात अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक
- - रात्री १० नंतर - सोलापूरहून बार्शीकडे प्रयाण
- - रात्री ११.३० वाजता - बार्शीत मुक्काम व राखीव.