अजिंक्यराणा पाटील वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:57 AM2021-01-13T04:57:06+5:302021-01-13T04:57:06+5:30

अनगर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा राजन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्यावतीने २१, २२ व २३ जानेवारी ...

State level basketball competition on the occasion of Ajinkyarana Patil's birthday | अजिंक्यराणा पाटील वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

अजिंक्यराणा पाटील वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

Next

अनगर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा राजन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंतयोगी प्रतिष्ठानच्यावतीने २१, २२ व २३ जानेवारी रोजी सायंकाळी होम मैदान येथे खुल्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांसाठी राज्यभरातून विविध जिल्ह्यांमधून संघ येणार आहेत. पहिले बक्षीस ३०,००७ रुपये व चषक, दुसरे बक्षीस २०,००७ रुपये व चषक आणि तिसरे बक्षीस १०,००७ व चषक आहे.

दरम्यान, २१ जानेवारी रोजी होम मैदान येथे सायंकाळी ६ वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमास माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी आमदार राजन पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, महेश कोठे, भारत जाधव, महेश गादेकर, पद्माकर काळे, पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, किसन जाधव, प्रताप चव्हाण, विद्या लोलगे, राजन जाधव, मनोज यलगुलवर उपस्थित राहणार आहेत.

२३ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होम मैदान येथे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी सभागृह नेते चेतन नरोटे, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, अमोल शिंदे, गणेश पाटील, विक्रांत वानकर, तोफिक शेख, विनोद भोसले, देवेंद्र कोठे, उमेश गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे.

या स्पर्धेसाठी श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य पाटील, अविनाश पवार, सर्फराज शेख, विकास लोंढे, प्रसाद पाटील, कार्तिक पाटील हे विशेष कष्ट घेत आहेत. (वा. प्र.)

---

फोटो : १२ अजिंक्यराणा पाटील

Web Title: State level basketball competition on the occasion of Ajinkyarana Patil's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.