राज्यस्तरीय कार्यक्रम; दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उदघाटन
By Appasaheb.patil | Published: January 7, 2024 05:15 PM2024-01-07T17:15:29+5:302024-01-07T17:16:28+5:30
सोलापूर : अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने ...
सोलापूर : अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य साहित्य संमेलन सोशल महाविद्यालयात झाले. सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी कुरान पठन करून संमेलनाची सुरुवात केली. यानंतर डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून संमेलनास सुरूवात झाली. याचवेळी शेकडो किलोमीटर पार करून आलेल्या राज्यभरातील कवींनी एकापेक्षा एक कवितांचे सादरीकरण करून सोलापूरकरांकडून वाहवा मिळविली.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील लेखिका प्रा. डॉ. अर्ज़िनबी शेख होत्या. यावेळी मंचावर स्वागताध्यक्षा सुरैय्या जहागीरदार, डॉ. अजीज नदाफ, प्राचार्य इ. जा. तांबोळी, अय्यूब नल्लामंदू , प्राचार्य शकील शेख, अनिसा शेख, ॲड. हाषम पटेल, मुस्लीम कबीर, सय्यद अलाऊद्दीन, सायराबानू चौगुले, खजीनदार हसीब नदाफ आदी उपस्थित होते. यानंतर बेन्नूर फौडेशनच्यावतीने मुबारक शेख यांना फखरोदीन बेन्नूर स्मृती पुरस्कार, तर फराश फौंडेशन तर्फे प्राचार्य तांबोळी यांना समाजरत्न पुरस्कार आणि शाहिदा सरयद यांना युगस्त्री फातीमाबी शेख साहित्य पुरस्कार -२४ सन्मान पूर्वक देण्यात आले. ॲड. हाषम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप झाला. सुत्रसंचालन खाजाभाई बागवान तर आभार इंतेखाब फराश यांनी मानले. संमेलन यशस्वीतेसाठी मजहर अल्लोळी, अनिसा सिकंदर शेख, डाॅ. महंमद शेख, इकबाल बागबान, अबुबकर नल्लामंदू, फारूक कोतकूंडे यांनी परिश्रम घेतले.