टेंभुर्णीतील विविध मागण्यांसाठी रिपाइंकडून बीडीओंना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:59+5:302021-02-06T04:40:59+5:30
निवेदनात म्हटले आहे की, वरील सर्व मागण्यांसाठी ग्रामपंचायत टेंभुर्णी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करीत आहे. सन २०१९ ...
निवेदनात म्हटले आहे की, वरील सर्व मागण्यांसाठी ग्रामपंचायत टेंभुर्णी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही दुर्लक्ष करीत आहे. सन २०१९ साली मंजूर झालेल्या रमाई घरकुल योजनेचे उर्वरित हप्ते अद्याप मिळाले नाहीत. शहरातील सर्वच स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. टेंभुर्णी शहराच्या पश्चिम बाजूस असलेली इतिहासकालीन वेशीची दुरुस्ती करावी, शहराच्या पश्चिम बाजूस असलेल्या ब्राह्मण तळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली ती काढावी, या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी लक्ष घालावे, अशी मागणी रिपाइं युवक आघाडीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी रिपाइं (आठवले गट) युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष बिभीषण कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब बनसोडे, तालुका सरचिटणीस महादेव साबळे व तालुका उपाध्यक्ष बालाजी गायकवाड उपस्थित होते.
----