पीकविम्यासाठी किसान मोर्चातर्फे खासदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:58+5:302021-04-28T04:23:58+5:30
सरकारने शेतकऱ्यांवर येणाऱ्या नैसर्गिक संकटात मदत मिळावी, यासाठी हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू केली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ४० ...
सरकारने शेतकऱ्यांवर येणाऱ्या नैसर्गिक संकटात मदत मिळावी, यासाठी हवामानावर आधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना लागू केली. या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ४० टक्के रक्कम व ६० टक्के रक्कम सरकारने विमा कंपनीकडे भरण्याचे ठरल्याने शेतकऱ्यांनी आपली रक्कम बँकांमध्ये जमा केली होती. यावर्षी सोलापूर, सातारा व जळगाव या जिल्ह्यांसाठी भारती ॲक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत या कंपनीने कोणत्याही प्रकारचा पीकविमा शेतकऱ्यांना दिलेला नाही. तरी माढा लोकसभेचे खासदार या नात्याने आपण स्वत: लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना दिले.
फोटो :::::::::::::::::::::
शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत निवेदन देताना जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर व अन्य.