मोहोळमध्ये वीजतोडणीबद्दल रासपकडून तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:21 AM2021-03-20T04:21:28+5:302021-03-20T04:21:28+5:30
माजी आमदार महादेव जानकरांच्या आदेशानुसार हे निवेदन करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, अधिवेशनकाळात विधानसभेत झालेल्या ...
माजी आमदार महादेव जानकरांच्या आदेशानुसार हे निवेदन करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, अधिवेशनकाळात विधानसभेत झालेल्या चर्चेत महावितरणला वीज तोडण्यास स्थगितीचे आश्वासन दिले होते. परंतु, अधिवेशन संपताच वीज तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती थांबविण्यात आली. हा शासनाचा दोनतोंडी निर्णय आहे.
वीजजोडणीबाबत शांततेने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात शेतकरीविरोधी शासनाचा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचे ऐन उन्हाळ्यात वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. ते त्वरित थांबविण्यात यावे; अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी तालुका संपर्कप्रमुख परमेश्वर पुजारी, विधानसभा अध्यक्ष अभिमान काळे, नागेश हजारे, तालुका सचिव नवनाथ लेंगरे, राजेंद्र वाघमोडे व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.