सातव्या वेतन आयोगासाठी राज्यव्यापी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:37+5:302021-06-26T04:16:37+5:30
२१ जून २०२१ पासून महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या महाविद्यालयासमोर व घरी मागण्यांचे पोस्टर हातात धरून फोटो काढून ...
२१ जून २०२१ पासून महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपापल्या महाविद्यालयासमोर व घरी मागण्यांचे पोस्टर हातात धरून फोटो काढून ते फोटो आठवडाभर मुख्यमंत्री, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, उपमुख्यमंत्री, संचालक व सहसंचालक उच्च शिक्षण यांना मेल, फेसबुकला, ट्विटरला टॅग केले.
या आंदोलनास सोलापूर, रत्नागिरी, रायगड, जळगाव, सातारा, सांगली, मुंबई, पालघर, अहमदनगर, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, लातूर, धुळे, अमरावती, बुलडाणा, गडचिरोली, अकोला, नांदेड, नाशिक, गोंदिया या जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाला आहे. १८ जुलै २०२१ पासून आंदोलनाचा पुढील टप्पा सुरू करतील, अशी माहिती आयटक संघटनेचे अध्यक्ष काॅम्रेड तानाजी ठोंबरे यांनी दिली आहे.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ. ए. बी. कुलकर्णी, कॉ. प्रवीण मस्तुद, आरती रावळे, उमेश मदने, विलास कोठावळे, हनुमंत कारमकर, महेंद्र मेठे, सुधीर सेवकर, अशोक पवार, गणेश करंजकर, दत्तात्रय पवार, अल्ताफ होटगी व राज्यभरातील शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.
---
फोटो : २५ बार्शी
बार्शी येथे आयटक संलग्न विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने ७ व्या वेतन आयोगासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.