२४ तास सतर्क राहा, पण आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:26 AM2021-08-14T04:26:58+5:302021-08-14T04:26:58+5:30
मोहोळ : पोलीस खात्यात काम करताना २४ तास अलर्ट राहावे लागते. वेळेचे बंधन नसते. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. व्यायामासाठी ...
मोहोळ : पोलीस खात्यात काम करताना २४ तास अलर्ट राहावे लागते. वेळेचे बंधन नसते. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. व्यायामासाठी ओपन जिम उभारल्याने पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास निश्चित मदत होईल, असा आशावाद कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी व्यक्त केला.
मोहोळ येथील पोलीस कॉलनी वसाहतीमध्ये ओपन जिमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे, पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे, सुधीर खारगे, अंकुश माने, नीलेश देशमुख, मुन्ना बाबर, मंगेश बोधले आदी उपस्थित होते.
.....
जिल्हाभर ओपन जिम उभारणार
पोलिसांच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी जिल्हाभर ओपन जिमची योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये चार ठिकाणी या ओपन जिमला मंजुरी मिळाली आहे. सर्वप्रथम मोहोळ पोलीस कॉलनीमध्ये जिम सुरू होत आहे.
- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक
.....
फोटो १३ मोहोळ १
मोहोळ पोलीस वसाहतीमध्ये ओपन जिमचे उद्घाटन करताना पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर आदी.