आर्थिक चक्रव्यूहात फसलेल्या अन्नदात्यावर ‘थकीत’चा कलंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:23 AM2021-07-27T04:23:28+5:302021-07-27T04:23:28+5:30

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत ...

The stigma of 'tiredness' on the food givers trapped in the economic maze | आर्थिक चक्रव्यूहात फसलेल्या अन्नदात्यावर ‘थकीत’चा कलंक

आर्थिक चक्रव्यूहात फसलेल्या अन्नदात्यावर ‘थकीत’चा कलंक

Next

माळशिरस : कृषी व्यवसायासाठी शेती, पाणी, वीज, याबरोबर भांडवलाचा सिंहाचा वाटा आहे. शेतीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवली खर्च करावा लागत आहे. यासाठी इतर सुविधांचा आसरा घेऊन शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये कर्ज शेती व शेती व्यवस्थापनासाठी वापरले. मात्र, निसर्ग, वीज, पाणी या गोष्टींच्या चक्रव्यूहात सापडलेल्या बळीराजाला बँकेच्या कर्ज परतफेडीपर्यंत पोहोचताच येईना. त्यामुळे पुन्हा बळीराजा कर्ज थकविणारा अथवा बुडव्या असा कलंक त्यांच्या माथी लागला जातो.

कृषी धोरणांमध्ये आधुनिक बदल करण्याची गरज तज्ज्ञांनी मांडली. मात्र, यासाठी भाग भांडवल आवश्यक असून, हा पैसा उभा करण्यासाठी बळीराजाची भ्रमंती सुरू झाली. अनेक बँका शेकडो शेतकऱ्यांना कर्जाच्या आशेने झुलवत ठेवतात. त्यामुळे आवश्यक त्यावेळी पैसा हाती न आल्यामुळे पुन्हा कृषी व्यवसाय नुकसानीकडे झुकला जातो. काही शेतकऱ्यांना मिळालेली गरजांची रक्कम विविध संकटांच्या तडाख्यात शेतकऱ्यांना परतफेड आवाक्‍याबाहेर जाते. त्यामुळे पुन्हा अशा प्रकारची कर्ज थकीत अवस्थेत अडकून पडतात.

सावकाराचा घ्यावा लागतोय आसरा

कृषिप्रधान देशात शेतकऱ्यांना उभारी देण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न करण्यात आले. यात सावकारी कर्जापासून शेतकऱ्याला मुक्त करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेतला. विविध शेतीपूरक व्यवसाय व शेतीसाठी पतपुरवठा केला. मात्र, याबाबत शेतकऱ्यांच्या नियोजनात विविध अडथळ्यांनी वर्चस्व दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक धोरण कमकुवत झाले. नाईलाजास्तव शेतकरी पुन्हा सावकारी कर्जाची वाट धरू लागला आहे.

कोट ::::::::::::::::

कृषी व्यवसायात वीज, पाणी व भांडवल याबरोबर हमीभाव, निसर्गाची साथ अत्यंत महत्त्वाची बाब आहे, शिवाय पायाभूत सुविधांसाठी शेतकऱ्यांना अमर्याद खर्च करावा लागतो. त्यामुळे सरकारने धोरणात्मक, दूरगामी उपाययोजनांचा अवलंब करण्याची गरज आहे.

- के.के. पाटील

Web Title: The stigma of 'tiredness' on the food givers trapped in the economic maze

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.