तरीही...नाटक मरणार नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:14 PM2018-09-27T12:14:46+5:302018-09-27T12:18:06+5:30

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांची मुलाखत 

Still ... play will not die! | तरीही...नाटक मरणार नाही ! 

तरीही...नाटक मरणार नाही ! 

Next
ठळक मुद्देतंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव - जयंत पवारनाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे - जयंत पवारनवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू - जयंत पवार

सोलापूर : हल्लीच्या काळात प्रेक्षकांचा कल दृक माध्यमांकडे वाढला आहे. त्यामुळे नाटक मागे पडत चालले आहे. नवभांडवलदारांचीही नाटक मरावे हीच इच्छा आहे; मात्र असे असले तरी नाटक वैश्विक नसून स्थानिक असल्याने ते कदापिही मरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी केले.

प्रयोग मालाड मुंबई आणि अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरच्या वतीने पार पडलेल्या एकांकिका स्पर्धेसाठी आले असता नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. कोल्हापुरातील नाट्यसमीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे आणि रजनीश जोशी यांनी ही प्रगट मुलाखत घेतली. ते म्हणाले, नाटक मागे पडत आहे. तंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव आहे. नाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे. नवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र नाटकातील विषय स्थानिक असल्याने ते प्रेक्षकांना आपले वाटतात. नाटकासाठी बरेच वेगळेपण लागते. प्रेक्षकांतही एकाग्रता  हवी असते. अलीकडच्या शॉर्ट फिल्मच्या जमान्यात नाटक मागे पडल्याची खंत असली तरी ते मरणार मात्र नाही. 

करुणेकडे कोणत्या नजरेने पाहता या प्रश्नावर ते म्हणाले, लेखकाला डोळे ताठ ठेवावे लागतात. करुणा आणि शोषणाकडे                           मी अनुकंपेने बघत नाही. लेखकाने निर्दयी व्हावे. त्या निर्दयतेतून वास्तव टिपावे, तरच  वाचकांच्या मनात करुणा निर्माण होईल. लेखकच रडायला लागला तर शोषण दिसणार नाही. वास्तवता दाखविणे हेच साहित्याचे काम आहे. ते आपण केले.

‘त्यांचे’ साहित्य माझ्या रक्तात डीएनएसारखे
- भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ यांच्यासारख्या लेखकांचे साहित्य आपण एवढे जिरवले की ते आपल्या रक्तात डीएनएसारखे उतरले आहे. या सर्व लेखकांच्या मर्यादा आणि उंची मला माहीत आहे. वाचकांना लेखकांच्या मर्यादा कळाव्या लागतात. आपण नाटकाकडून कथालेखनाकडे वळलो. प्रत्यक्षात कथेतही नाटक असते आणि नाटकातही कथा असते. खरे तर साहित्यातील या सीमारेषा आता धुसर व्हायला हव्या. ‘काय डेंजर वारा सुटलायं’ मध्ये मी जागतिकीकरणाचा धोका मांडला. नाटक हे समूहाने करायचे असते तर कथालेखन वाचकांशी बांधिल असते. नाट्य रंगमंचाच्या अवकाशात असते. ते ताण निर्माण करते. त्यातून कलावंतांचे कसब पणाला लागते.

Web Title: Still ... play will not die!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.