अकलूज नगरपरिषदेसाठी दगडफोड आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:16 AM2021-07-01T04:16:25+5:302021-07-01T04:16:25+5:30
अकलूज नगरपरिषदेसाठी व नातेपुते नगरपंचायतीसाठी अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणाचा बुधवारी नववा दिवस ...
अकलूज नगरपरिषदेसाठी व नातेपुते नगरपंचायतीसाठी अकलूज येथील प्रांत कार्यालयासमोर अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणाचा बुधवारी नववा दिवस असून, नऊ दिवसांनंतर शासनाने दखल न घेतल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. लोकभावना संतप्त होत आहेत. या साखळी उपोषणास विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात येत आहे. बुधवारी हाॅटेल असोसिएशन, हातगाडी संघटना, कर्मवीर नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, सदस्य संजय साठे, किशोर राऊत, माजी सरपंच विठ्ठलराव गायकवाड, माजी सदस्य अशोकराव जावळे, दीपक खंडागळे, दादा तांबोळी, विशाल मोरे, विनोद साठे, राजेंद्र घोरपडे सहभागी झाले होते.
संत नामदेव महाराज प्रतिष्ठान, नॅशनल दलित पँथर, वंदे मातरम गणेशोत्सव मंडळ, माळशिरस तालुका मातंग दोरखंड उत्पादक सहकारी संस्थेने पाठिंबा दिला, तर वडार समाजाच्या युवकांनी उपोषणस्थळी दगडफोड करीत आपला कृतिपूर्ण पाठिंबा दिला. गणेश देवकर, चंदू काळे, दिलीप पवार, सोमनाथ पवार, दीपक माने, विशाल काळे, बजरंग काळे, संजय काळे, चंद्रकांत पवार, तेजस पवार, शिवा काळे, आकाश काळे, अजय पवार, सूरज काळे, अमर पवार, विजय काळे, विश्वास काळे, बजरंग काळे, आदी युवक दगडफोड अंदोलनात सहभागी झाले होते.
----
अजित पवार राजकारण आणताहेत
अकलूज नगरपरिषद हवी ही कायदेशीर मागणी आहे. तरी यात राजकारण आणून उपमुख्यमंत्री अजित पवार अकलूज नगरपरिषद जाणीवपूर्वक होऊ देत नाहीत. सलग नऊ दिवस साखळी उपोषण सुरू आहे. तरी सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणाच्या ठिकाणी दगडफोड आंदोलन केले. शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोड आंदोलन करू, असा इशारा यावेळी समाजाच्या वतीने देण्यात आला.
नऊजणांनी मुंडण करून निषेध
बुधवारी साखळी उपोषणाला नऊ दिवस झाले म्हणून कपिल भिसे, विजय कांबळे, तानाजी शिंदे, राहुल शिंदे, भाऊसाहेब बाबर, मल्हारी बाबर, कैलास मिले, नरेंद्र पाटोळे, नेताजी भोसले या नऊजणांनी मुंडण करून शासनाचा निषेध केला.