कोरोनाच्या काळात जनतेकडून होणारी दंडवसुली थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:18 AM2021-06-02T04:18:09+5:302021-06-02T04:18:09+5:30
आर्थिक कोंडीत असताना अशा परिस्थितीत बार्शी शहर व तालुक्यातील गोरगरीब वाहनधारकांकडून होणारी दंडवसुली बंद करण्यासाठी बार्शी ...
आर्थिक कोंडीत असताना अशा परिस्थितीत बार्शी शहर व तालुक्यातील गोरगरीब वाहनधारकांकडून होणारी दंडवसुली बंद करण्यासाठी बार्शी मनसेच्या वतीने मंगळवारपासून तहसीलसमोर अर्धनग्न बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मनसे शहराध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले असून, कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त आहे. जनतेची कामे बंद असल्याने उत्पन्नाची सर्व साधने बंद आहेत. शिवाय कोरोना रुग्णांच्या औषधासाठी घरातील व्यक्तींना पळापळ करावी लागते. अशावेळी दंड, जप्तीमुळे नाहक त्रास होतो. शहानिशा करूनच कारवाई करावी. अशी दंडवसुली बंद करावी, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
----
फोटो