शेतीपंपाची सक्तीची वीजबिल वसुली थांबवा; माढा तालुक्यातील शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 12:29 PM2021-08-23T12:29:18+5:302021-08-23T12:31:34+5:30
माढा महावितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी भाजीपाला घेऊन महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मारला.
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील शेतीपंपाची सुरू असलेली सक्तीची वीजबिल वसुली त्वरीत थांबविण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी महावितरणच्या कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनात शेतकऱ्यांनी भाजीपाला घेऊन महावितरण कार्यालयासमोर ठिय्या मारला.
माढा तालुक्यात सध्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज बिलाची विद्युत वितरण कंपनीकडून सक्तीची वसुली सुरू आहे, त्यातच कोरोनाचे महाभयंकर संकट सुरू आहे व शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कोणत्याही बाजारपेठेत दर नाही, म्हणून वितरण कंपनीने वसुली त्वरित बंद करावी अशी मागणी संपूर्ण तालुक्यातून जोर धरत असून त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी सकाळी मोडनिंब शहरातून भाजीपाला घेऊन शेतकऱ्यांनी विद्दुत वितरण कंपनीच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. यावेळी समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.