आताच उजनीतून पाणी सोडणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:26+5:302021-09-08T04:28:26+5:30

उजनी धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस कमी असल्यामुळे उजनी धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरले नाही. अर्धवट अवस्थेत भरलेले आहे. भविष्यात सोलापूर ...

Stop leaking water from Ujjain now | आताच उजनीतून पाणी सोडणे थांबवा

आताच उजनीतून पाणी सोडणे थांबवा

Next

उजनी धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस कमी असल्यामुळे उजनी धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरले नाही. अर्धवट अवस्थेत भरलेले आहे. भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पाण्याची टंचाई पाहता प्रथमतः उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तत्काळ बंद करून करावे, अशी मागणीही बाळराजे पाणी यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा बँकेचे संचालक भारत सुतकर, सरचिटणीस प्रशांत बचुटे, पेनुरचे उपसरपंच रामदास चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे, उपसरपंच विजय कोकाटे, युवा नेते सचिन चवरे, कार्याध्यक्ष विकास कोकाटे, सरपंच पोपट जाधव, सरपंच संदीप पवार, चेअरमन सिद्धेश्वर बचुटे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

..........

आवश्यकता नसताना पाण्याचा अपव्यय

सोलापूर जिल्ह्यात सध्या गेल्या पाच दिवसांपासून सर्वदूर पाऊस असून ओढे, नाले, तलाव तुडुंब भरलेले आहेत. परिणामी सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची आवश्यकता नाही तरीही जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे उजनीच्या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडले जात आहे. या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताच उपयोग होत नसून पाण्याचा अपव्यय होत आहे, असेही बाळराजे पाटील यांनी म्हटले आहे.

.......

फोटो : ०७बाळराजे पाटील.

070921\fb_img_1597924934241.jpg

पाणीटंचाई टाळण्यासाठी उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी तात्काळ बंद करावे-बाळराजे पाटील

Web Title: Stop leaking water from Ujjain now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.