ओबीसी आरक्षणावरून माढ्यात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:34+5:302021-07-04T04:16:34+5:30
याबद्दल अधिक माहिती अशी, ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा प्राप्त नसल्याचे कारणामुळे ५० टक्केच्या पुढील आरक्षण रद्द तर आतील ...
याबद्दल अधिक माहिती अशी, ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डाटा प्राप्त नसल्याचे कारणामुळे ५० टक्केच्या पुढील आरक्षण रद्द तर आतील आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय नुकताच झाला. यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आरक्षण पूर्ववत होईपर्यंत कोणत्याही निवडणुका घेऊ नये आदी मागण्यांसाठी माढा शहरातील सर्व ओबीसी समाजबांधवांनी चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी माढा पोलीस ठाण्यास निवेदन देताना महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिनाथ माळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिनेश गाडेकर, डाॅ. हनुमंत क्षीरसागर, माजी सरपंच राजेंद्र राऊत, रासपचे गोरख वाकडे, नगरसेवक समीर सापटणेकर, सराफ असोसिएशनचे प्रमोद वेदपाठक, मुस्लीम समाजाचे बाबुलभाई बागवान, शिवाजी माने, प्रसाद भास्करे, डाॅ. यू. एफ. जानराव, नीलेश बंडगर, राजाराम देवकर, हणुमंत भोसले, भारत टिंगरे यांच्यासह ओबीसी सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
----