रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे तत्काळ थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:07+5:302021-08-24T04:27:07+5:30

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा भाजपतर्फे सोमवारी धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. मंगळवेढा शहरामध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक ...

Stop substandard road works immediately | रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे तत्काळ थांबवा

रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे तत्काळ थांबवा

Next

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा भाजपतर्फे सोमवारी धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. मंगळवेढा शहरामध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक अडथळा असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. विकासकामांच्या नावाने नागरिकांची मते न जाणून घेता कामे चालू आहेत. या कामांचा नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपाने उशिरा का होईना कामाविषयी आवाज उठविला आहे.

यावेळी सांगोला नाका परिसरात बगीचा करण्याचा निर्णय रद्द करावा, नागरिकांना घरकुलासाठी जागा द्यावी, प्रत्येक व्यापारी संकुलाजवळ वाहनतळ व्यवस्था करावी, आधीचा रस्ता उकरून रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण करावीत, शिवप्रेमी चौक ते दामाजी चौक, पंढरपूर अर्बन बँक ते चोखामेळा चौक रस्ता डांबरीकरण करावा, स्वच्छ व वेळेत पाणीपुरवठा करावा, डेंग्यू आजाराबाबत उपाययोजना करावी, गटारी वेळेवर काढाव्यात, टॅक्सपोटी घेतलेला शिक्षण कर, वृक्षकर, पाणीपट्टी यांचे ऑडिट करावे, श्रीसंत दामाजी पंतांच्या पुतळ्यावर लवकरात लवकर छत्र बसवावे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जुनी भाजी मंडईमधील स्मारकाचे काम लवकर पूर्ण करावे, या मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांना दिले.

यावेळी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, जिल्हा चिटणीस संतोष मोगले, जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर, तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकुल, शहराध्यक्ष गोपाळ भगरे, धनंजय खवतोडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष सुशांत हजारे, नगरसेवक चंद्रकांत पडवळे, नगरसेवक दीपक माने, आदित्य मुदगुल, नागेश डोंगरे, सत्यजित सुरवसे, सैफन शेख, सागर ननवरे, बबलू सुतार, सरोज काझी, दत्ता पवार आदी उपस्थित होते.

फोटो ओळी ::::::::::::::::

विविध मागण्यांचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देताना भाजपचे शिष्टमंडळ.

230821\1723-img-20210823-wa0027.jpg

प्रशासनाधिकारी निशिकांत परचंडराव यांना मागण्यांचे निवेदन देताना भाजपचे शिष्टमंडळ

Web Title: Stop substandard road works immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.