कल्याण, नागपूर, होटगी, कोपरगाव अन् कान्हेगाव स्थानकावर आता नव्या गाडयांना थांबा; जाणून घ्या सविस्तर
By Appasaheb.patil | Published: August 22, 2023 02:17 PM2023-08-22T14:17:36+5:302023-08-22T14:18:17+5:30
नागपूर स्टेशनवर यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरांतो एक्स्प्रेस, दिल्ली सराय रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे.
सोलापूर : मध्य रेल्वे विभागातील कल्याण, नागपूर, होटगी, कोपरगाव अन् कान्हेगाव स्थानकावर आता नव्या गाडयांना थांबा देण्यात आला आहे. त्याबाबत निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी घेतला.
त्यानुसार आता कल्याण स्टेशनवर सीएसएमटी-हावरा दुरांतो एक्सप्रेस, हावरा सीएसटीएम दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी-पाटणा, पाटणा - सीएसएमटी सुविधा एक्स्प्रेस, एलटीटी विशाखापट्टणम एक्स्प्रेस, विशाखापट्टणम एलटीटी एक्स्प्रेस, उदयपूर- म्हैसूर हमसफर एक्स्प्रेस, म्हैसूर- उदयपूर हमसफर एक्स्प्रेस, काकीनाडा एक्स्प्रेस, काकीनाडा- एलटीटी एक्स्प्रेस या गाडयांना थांबा देण्यात आला आहे.
नागपूर स्टेशनवर यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरांतो एक्स्प्रेस, दिल्ली सराय रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे.
याशिवाय सोलापूर विभागातील होटगी स्टेशनवर हुबली- हैदराबाद एक्स्प्रेस व हैदराबाद हुबली एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. कोपरगाव स्टेशनवर शिर्डी- विशाखापट्टणम एक्स्प्रेस, विशाखापट्टणम शिर्डी एक्स्प्रेस ला थांबा दिला आहे तर कान्हेगाव स्टेशनवर दौंड- निजामाबाद एक्सप्रेस व निजामाबाद दौंड एक्स्प्रेसला थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.