वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करणे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:53+5:302021-08-23T04:24:53+5:30

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना महावितरणचे खासगीकरण होईल, बिल भरावे असे आवाहन केले होते. त्यावेळी शेतकरी संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली ...

Stop turning off Rohitra for electricity bill recovery | वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करणे थांबवा

वीजबिल वसुलीसाठी रोहित्र बंद करणे थांबवा

Next

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना महावितरणचे खासगीकरण होईल, बिल भरावे असे आवाहन केले होते. त्यावेळी शेतकरी संघटना व महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि सर्व शेतकऱ्यांनी बिले भरली. महावितरणने परत शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. कोरोनामुळे शेतीमालाचे पडलेले दर, मागील वर्षी गेलेल्या उसाचे अजूनही बिल मिळाले नाही, अशा परिस्थितीत वीजबिल भरणे शक्य नाही. कृषिपंपाचे कनेक्शन कट केले आहे. यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये लक्ष घालून वीजबिल वसुली बंद करून वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आदेश महावितरणला द्यावेत, अशी मागणी खा. शरद पवार यांच्याकडे स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजहान शेख, कार्याध्यक्ष सचिन आटकळे, युवा तालुकाध्यक्ष अमर इंगळे आदी उपस्थित होते.

Web Title: Stop turning off Rohitra for electricity bill recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.