रांगेला थांबले.. टाइम संपला.. तेथेच झोपले दुसऱ्या दिवशी पुन्हा रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:27+5:302021-03-16T04:23:27+5:30
दुय्यम निबंधक कार्यालयात कामासाठी दिवसभर रांगेत थांबावे लागते. काम न झाल्याने कागदपत्रांसह तेथेच मुक्काम करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ...
दुय्यम निबंधक कार्यालयात कामासाठी दिवसभर रांगेत थांबावे लागते. काम न झाल्याने कागदपत्रांसह तेथेच मुक्काम करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तेव्हा घरातील अन्य सदस्य जेवणाची सोय करीत आहेत; पण तेथेच मुक्काम करण्यास भाग पाडत आहेत. खरेदी खताच्या कामासाठी २ मार्चपासून माढ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. झालेला व्यवहार पूर्ण कधी होणार याची चिंता लागली असून, काल रात्रीपासून कार्यालयासमोर नंबरसाठी झोपलो आहे. आजही दिवसभर नंबर आला नाही, असे चोभे पिंपरीचे अभयसिंह शेंडगे यांनी सांगितले.
मॉर्गेज व इतर कामासाठी गेल्या १५ दिवसांपासून कुटुंबीयांसोबत दररोज हेलपाटे मारत आहे; पण अद्याप काम झाले नाही, तरी शासनाने यावर उपाय काढावा, अशी मागणी टेंभुर्णीचे सचिन राऊत यांनी केली.
कोट :::::::::
सुटीच्या दिवशीही सर्व्हर व्यवस्थित चालल्यास व कनेक्टिव्हिटी मिळाल्यास लोकांच्या सोयीसाठी काम करण्यास तयार आहोत. मात्र, यंत्रणा व्यवस्थित चालणे गरजेचे आहे.
- ए. एस. चव्हाण,
दुय्यम निबंधक
फोटो
१५माढा०१
ओळी
माढ्यातील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर खरेदी-विक्रीच्या कामासाठी रात्रभर ठिय्या मारलेले शेतकरी.