वादळी वाऱ्यामुळे सहा घरांवरील पत्रे उडाले ; शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:09+5:302021-05-08T04:23:09+5:30
या वादळी वाऱ्यात रुपेश रामचंद्र चव्हाण, छाया भीमराव केंगार, मारुती आप्पा देशमुख, धुळदेव विलास खरात, लहानू सुखदेव कोळेकर, ...
या वादळी वाऱ्यात रुपेश रामचंद्र चव्हाण, छाया भीमराव केंगार, मारुती आप्पा देशमुख, धुळदेव विलास खरात, लहानू सुखदेव कोळेकर, शिवाजी महादेव देशमुख हे आपापल्या कामात व्यस्त होते. गुरुवारी दुपारी ३ च्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वाहू लागले. यामध्ये सहा जणांच्या घरावरील पत्रे उडून दूरवर जाऊन पडले. वाऱ्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त पडल्याने त्याचेही नुकसान झाले. मात्र कोणालाही इजा पोहोचली नाही. तर छाया केंगार यांच्या घरावरील पत्रे उडून महादेव विठोबा केंगार यांच्या डाळिंबाच्या बागेवर पडल्यामुळे बागेचे मोठे नुकसान झाले.
तसेच शिवाजी देशमुख यांच्या घरावरील पत्रे त्यांच्या १ एकर कारल्याच्या मांडवावर अस्ताव्यस्त पडल्याने नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती सरपंच पूनम पाटील, पोलीस पाटील हनुमंत जाधव, माजी सरपंच आप्पा चव्हाण यांनी महसूल प्रशासनास दिली. गाव कामगार तलाठी विद्या शिंदे, ग्रामसेविका सुषमा मोरे, कृषी सहाय्यक नलावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले. पंचनामा अहवाल तहसील कार्यालय सांगोला यांच्याकडे पाठवून दिला आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::
वादळी वाऱ्यात अचकदाणी अंतर्गत बेंदवस्ती, केंगारवस्ती येथील घरावरील पत्रे उडाल्याचे छायाचित्र.