वादळी वारे.. वीज गुल.. जीव वाचवण्यासाठी पळापळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:21 AM2021-05-16T04:21:22+5:302021-05-16T04:21:22+5:30

या पावसामुळे उन्हाळी कांदा भिजला, तर वादळी वाऱ्याने गंजीचा कडबा उडाला आहे. मात्र, यामध्ये नुकसान किती झाले याचा अंदाज ...

Stormy winds .. Power outages .. Running to save lives | वादळी वारे.. वीज गुल.. जीव वाचवण्यासाठी पळापळ

वादळी वारे.. वीज गुल.. जीव वाचवण्यासाठी पळापळ

Next

या पावसामुळे उन्हाळी कांदा भिजला, तर वादळी वाऱ्याने गंजीचा कडबा उडाला आहे. मात्र, यामध्ये नुकसान किती झाले याचा अंदाज आला नसल्याचे सांगण्यात आले. उत्तर सोलापूर तालुक्यात शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जोरदार वादळ आले. हे वादळ तासभर वाहत होते. कोणी जनावरांचे दूध काढत होते, तर कोणी वैरण टाकत होते. अंधार पडल्याने काळोख होताच त्यातच ढग जमल्याने अधिक काळेकुट्ट दिसू लागले.

जोरदार वाऱ्यामुळे नुकसान होत असतानाच पाऊस सुरू झाला. विजाही चमकू लागल्या. उघड्यावर पडलेला कांदा भिजला, तर वादळी वाऱ्यामुळे गंजीचा कडबा उडून अस्ताव्यस्त पडला. मात्र, यात किती नुकसान झाले याचा अंदाज आला नाही. काही ठिकाणी तर पत्र्याचे शेडही उडाल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Stormy winds .. Power outages .. Running to save lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.