गांजा, खसखस पिकविल्यास थेट तुरूंगात; सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांचा इशारा

By रवींद्र देशमुख | Published: March 20, 2023 04:32 PM2023-03-20T16:32:41+5:302023-03-20T16:33:20+5:30

कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिल्या. 

straight to jail if you grow marijuana, poppy; Warning of Superintendent of Police of Solapur | गांजा, खसखस पिकविल्यास थेट तुरूंगात; सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांचा इशारा

गांजा, खसखस पिकविल्यास थेट तुरूंगात; सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांचा इशारा

googlenewsNext

रविंद्र देशमुख/सोलापूर

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लांटमध्ये कोणत्याही प्रकारे अंमली पदार्थ निर्मिती होत नाहीत, याबाबत सतर्क राहावे. कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पीक पाहणीच्या वेळी गांजा, खसखस अशा पिकांच्या लागवडीबद्दल खात्री करावी. असे प्रकार आढळल्यास त्वरित पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिल्या. 

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन कार्मिक, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिन कांबळे, कृषि विभागाचे तंत्र अधिकारी सी. बी. मंगरूळे, टपाल विभागाचे एम. आर. पल्लेवाड आदिंसह समितीचे सदस्य उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे म्हणाले, जिल्हा तसेच तालुका पातळीवर आढळणाऱ्या अंमली पदार्थाचे सेवन व वापर, तसेच अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच त्या संदर्भात येणाऱ्या समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे समिती सदस्यांनी तालुके दत्तक देऊन संबंधित तालुक्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम हाती घ्यावेत असेही सांगितले.

Web Title: straight to jail if you grow marijuana, poppy; Warning of Superintendent of Police of Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.